मुंबई | राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. सध्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भेटणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
दरम्यान उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या वेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत सुद्धा पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत. या तीनही नेत्यांमध्ये कोणती चर्चा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत कुणाला कुठल्या जागा द्यायच्या, याबाबत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, देशातील महत्त्वाच्या विरोधी पक्षांची एकजूट झाली आहे. या विरोधी पक्षांची इंडिया आघाडी स्थापन झाली असून या आघाडीच्या तीन मोठ्या मॅरेथॉन बैठका देखील पार पडल्या आहेत. पण त्यानंतर इंडिया आघाडीच्या फार बैठका पार पडल्या नाहीत.
उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. इंडिया आघाडीतील पक्षांमधील संबंध ताणले गेले असले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे संबंध दृढ राहिले पाहिजेत, यासाठी प्रयत्न होताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भुजबळांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचा मराठा आरक्षणाला विरोध!
बांदेकरांना पुन्हा संधी नाही; सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद ‘या’ नेत्याकडे
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप
मराठा आरक्षणावर बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य!
मोठी बातमी! ठाकरेंना धक्का; सगळ्यात जवळच्या नेत्याला ईडीचं समन्स