बांदेकरांना पुन्हा संधी नाही; सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद ‘या’ नेत्याकडे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मुंबई येथे असेलेलं सिद्धिविनायक गणपती मंदीर यांच्या न्यास समितीचे अध्यक्षाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मराठी टेलिव्हिजन शोवर चालू असलेला होम मिनिस्टरच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले तसेच ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांच्याकडे मुंबईतलं श्री सिद्धिविनायक मंदिरचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं.

नेमकं काय आहे प्रकरण ?

दरम्यान आता सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिंदे गटाच्या सरवणकरांची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. गेल्या गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावेळी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी सदा सरवणकर अडचणीत सापडले होते. याप्रकरणी सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली होती.

गेल्या गणेशोत्सवात शिवसेनेच्या दोन गटात तूफान गोंधळ झाला होता. त्याच्या चर्चा रजकीय वर्तुळात देखील चांगल्याच रंगल्या होत्या. मात्र आता सरवणकरांना सिद्धिविनायक पावला असून सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी सदा सरवणकर यांची नियुक्ती झाली आहे.

अनेक दिवसांपासून राजकारणात सरवणकरांकडे मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याच्या चर्चा होत्या. अनेक दिवसांपासून तर्कवितर्क देखील लावले जात होते.

अशातच आज सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नेमणूक झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. शिवसेनेत असताना सरवणकरांनी विभागप्रमुख, स्थायी समिती अध्यक्ष अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप

मराठा आरक्षणावर बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य!

मोठी बातमी! ठाकरेंना धक्का; सगळ्यात जवळच्या नेत्याला ईडीचं समन्स

शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का!

कौतुकास्पद! मेंढपाळाच्या लेकीनं बापाचं नाव काढलं; केली ही कामगिरी