कौतुकास्पद! मेंढपाळाच्या लेकीनं बापाचं नाव काढलं; केली ही कामगिरी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर सगळं काही शक्य होतं. परिस्थीतवर मात करूनही खूप काही गोष्टी साध्य करता येतात. याचंचं उदाहरण म्हणजे अर्चना डोळझाके. अर्चना डोळझाके ही भारतीय नौदलात दाखल झाली आहे.

अर्चना जालना जिल्ह्यातील वूटवर या गावची रहिवासी आहे. आई-वडिलांकडे केवळ अडीच एकर शेत जमीन असून ते पारंपारिक मेंढी पालनाचा व्यवसाय करतात. त्यांना एकूण पाच मुली त्यापैकी अर्चना सर्वात लहान.

मोठ्या असलेल्या चारही बहिणीचं कमी वयातच लग्न झालं. त्यामुळे त्या पुढे शिकू शकल्या नाहीत. मात्र अर्चनाने खूप शिकावी अशी सगळ्यांचीच इच्छा होती.

छत्रपती संभाजीनगर येथे राहत असताना महिन्याला आठ हजारांचा खर्च तिला यायचा. मेंढी पालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या आई-वडिलांना या खर्चाचे दर महिन्याला टेन्शन असायचं. मात्र तडजोड करून त्यांनी पैसे पुरवण्यात कुठेही कमतरता भासू दिली नाही.

मोबाईल वरती इंटरनेटवर माहिती मिळवून तिने संभाजीनगर मधील एका अकॅडमीत प्रवेश घेतला. इथूनच अर्चनाच्या संघर्षमय प्रवासाची सुरुवात झाली.

अर्चनाला देखील तिच्या आई-वडिलांची तसेच परिस्थितीची जाणीव असल्याने तिने देखील कसून सराव केला. तसेच अभ्यासात देखील मन लावले. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर तिने अखेर वर्दी मिळवलीच.

महत्त्वाच्या बातम्या- 

पवारांच्या काटेवाडीत भाजपचा शिरकाव, पण किंग ठरले अजित पवारच!

‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लीपवरून नवा वाद, जरांगे भडकले

रश्मिका मंदानाचा नको त्या अवस्थेतला व्हिडीओ व्हायरल; पाहून तुम्हालाही बसेल धक्का

कालीचरण महाराजांची राजकारणात एन्ट्री?; घेतला मोठा निर्णय

भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबाला