‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लीपवरून नवा वाद, जरांगे भडकले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

छत्रपती संभाजीनगर | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी उपोषण मागे घेतलं. मात्र तरी देखील जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जरांगे पाटील राज्यात दौरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला सरकारकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. राज्य सरकारने यादृष्टीने तोडगा काढण्याची तयारीही दर्शविली होती.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं एका कार्यकर्त्यासोबत कथित संभाषण झालं. या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. काय नाही ती सर्व मंडळी आलेली आहेत. आपण आवाज उठवायला पाहिजे. मी तर म्हणतो आवाज उठवा, असं भुजबळ म्हणाले. व्हायरल झालेल्या त्या ऑडिओ क्लिपला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.

काय म्हणाले जरांगे पाटील?

करेंगे या मरेंगे हा त्यांचा प्रश्न आहे. आमचं वाक्य लढेंगे आणि जितेंगे आहे. महाराष्ट्रात शांततेत आंदोलनं सुरु आहे… बाकी प्रश्न ज्याच्या त्याच्या विचाराचा आहे. आम्ही अतिक्रमण केलं नाही आणखी लढाई सुरू आहे.

जरांगे पुढे म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांचा कुणालाही पाठिंबा असतो, आम्हाला पण आहे. मी भुजबळांचं पूर्ण रेकॉर्डिंग ऐकलं नाही. या पाठीमागे राज्यात अशांतता पासरवायची असेल. आम्ही मराठे विचलित होणार नाहीत, मग कुणीही काहीही बोलू द्या.

थोडक्यात बातम्या-

रश्मिका मंदानाचा नको त्या अवस्थेतला व्हिडीओ व्हायरल; पाहून तुम्हालाही बसेल धक्का

कालीचरण महाराजांची राजकारणात एन्ट्री?; घेतला मोठा निर्णय

भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबा

मोठी बातमी! ऐन दिवाळीत छत्री घेऊन बाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा

मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, आता केली ‘ही’ मोठी घोषणा!