भाजपला आणखी एक धक्का; ‘या’ ग्रामपंचायतीत 30 वर्षांनंतर झालं सत्तांतर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पंढरपूर | राज्यातील अनेक ग्रामपंचातींवर अजित पवार गट आणि भाजपने विजय मिळवला आहे. दुसरीकडे ठाकरे गट आणि काँग्रेसने देखील महत्वाच्या ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. अशातच पंढरपूरमध्ये भाजप आमदार विजयसिंह मोहिते पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

माळशिरजमध्ये 30 ग्रामपंचायतीत वर्षांनंतर सत्तांतर झालं आहे. माळशिरजमध्ये राष्ट्रवादीने एकहाती विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीच्या नंदा रामदास या सरपंचपदी निवडून आल्या आहेत.

राष्ट्रवादीने भाजपचा गड उध्वस्त केला असून एकहाती सत्ता मिळवली आहे. आमदार विजयसिंह मोहिते पाटील यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत निकालमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल अजित पवार गट दुसऱ्या स्थानावर आहे. एकूण 2359 ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.

राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान पार पडलं. राज्यभरात आज दिवसभरात 2 हजार 259 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आज या ठिकाणी मतमोजणी सुरु झाली आहे. त्यात अनेक प्रस्थापितांना धक्के बसले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

बारामतीत अजित पवारच ‘दादा’; शरद पवारांचं टेंशन वाढलं 

भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबा

मोठी बातमी! ऐन दिवाळीत छत्री घेऊन बाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा

मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, आता केली ‘ही’ मोठी घोषणा!

याची देही याची डोळा!, रेकॉर्डब्रेक लोकांनी पाहिला ‘विराट’ सोहळा!