मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, आता केली ‘ही’ मोठी घोषणा!

छत्रपती संभाजीनगर | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान माझी प्रकृती आता ठणठणीत आहे असं म्हणत जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे पाटील यांनी गेले आठ ते नऊ दिवस अन्न पाण्याला हात न लावता आमरण उपोषण केलं. दरम्यान, जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी मात्र ते पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत.

जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात का उतरणार?

जरांगे पाटील म्हणाले की, काळजी करु नका. मी ठणठणीत आहे,  डॉक्टरांनी मला ठणठणीत बरं केलं आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. आतापर्यंत मराठा समाजावर खूप अन्याय झाला आहे. परंतु आता चांगले दिवस आले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचा दौरा करणार असल्याचं सांगितलं आहे. राज्य सरकारची मदार क्युरिटीव पेटिशनवर आहे. मात्र, त्यावर आम्हाला फारसा विश्वास नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं.

तो पूर्ण उपचार नसून फक्त मलम आहे. त्यामुळे आम्हाला सरसकट ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे हीच आमची मागणी आहे. याचाच विचार राज्य सरकारने करावा, असे जरांगे पाटलांनी सांगितलं.

राज्यातील प्रत्येक गावात 1 डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसेच मी पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. महाराष्ट्रातील दौरा कधीपासून सुरु होणार ते उद्या किंवा परवा जाहीर करणार आहे. या दौऱ्यात आतापर्यंत राहिलेल्या भागांत मी जाणार असून मराठा समाज बांधवांची भेट घेणार आहे, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

याची देही याची डोळा!, रेकॉर्डब्रेक लोकांनी पाहिला ‘विराट’ सोहळा!

बीडमध्ये घरं पेटवलेल्या आंदोलकांचं आता काही खरं नाही… धनंजय मुंडे अॅक्शनमध्ये…

‘हा’ शेअर मोठा धमाका करण्याची शक्यता; गुंतणूकदारांची दिवाळी गोड होणार?

‘शेवटी तो माझा भाऊ आहे’; सुप्रिया सुळे थेट बोलल्या

‘तुमचे 50% कुठे…’; नाशिक लाचप्रकरणी धक्कादायक माहिती समोर