‘तुमचे 50% कुठे…’; नाशिक लाचप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

नाशिक | नाशिक येथे सर्वात मोठं लाचेचं प्रकरण (Bribe Case) उघडकीस आलं आहे. राज्यात भ्रष्टाचार विरोधी जनजागृती दक्षता सप्ताह सुरु आहे. त्याचवेळी अहमदनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा सर्वात मोठी कारवाई करण्यात आली.

नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दोन अभियंत्यांवर लाच प्रकरणात कारवाई केली. अमित किशोर गायकवाड आणि गणेश वाघ या दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात सध्या मोठ मोठे खुलासे बाहेर येत आहेत.

MIDC चे सहाय्यक अभियंता असलेल्या अमित गायकवाड याने एका शासकीय ठेकेदारास 1000 mm व्यासाच्या पाईपलाईनचे काम दिलं होतं. MIDC तील लोखंडी पाइपलाइन बदलण्यासाठी ठेकेदारला दिलेल्या कामांसाठी ही लाच मागितली होती.

तब्बल 31 कोटी 57 लाखांच्या कामाची अनामत रक्कम 2 कोटी 67 लाख रुपये मिळवून देण्यासाठी ही लाच मागितली गेली. ही लाच छत्रपती संभाजीनगर येथून एका ठेकेदाराकडून मागण्यात  आली होती. त्याने केलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल 15 दिवस फोन कॉल रेकॉर्ड केले. त्यानंतर कारवाईसाठी सापळा रचला.

अमित गायकवाड आणि गणेश वाघ या दोघांचे काॅल रेकाॅर्ड पोलिसांनी बाहेर काढले त्यावेळी “सर, पैसे मिळाले आहेत, तुमचे 50% कुठे पाठवू सांगा..’ त्यानंतर गणेश वाघ म्हणाला, ‘अरे व्वा व्वा.. सध्या तुझ्याकडेच ठेव. तुलाच ते पोहोचवायचे आहेत, ठिकाण कळवतो.”

‘तुझ्या कष्टाचे फळ तुला मिळालंच’ असं संभाषण लाचलुचपत विभागाने रेकॉर्ड केलं आहे. या दोघांमधील संभाषण संपल्यावर एसीबीने गायकवाड याला एक कोटी रुपयांसह ताब्यात घेतलंय.

थोडक्यात बातम्या- 

“वेळ काळ सांगा मी लढायला तयार”, सुषमा अंधारेंचं ‘या’ नेत्याला थेट चॅलेंज

लोकांची दिवाळी गोड!, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा

“आम्हाला जिवंत जाळण्याचा प्लॅन होता”, माजी आमदाराच्या आरोपांनी खळबळ

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसणार?, “आता उरलेले आमदार…”

‘ते 10 लाखांचे चेक्स…’; आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची सरकारकडून अवहेलना