लोकांची दिवाळी गोड!, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

रायपूर | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा छत्तीसगडमधील दुर्ग येथे प्रचार पार पडला. पाच राज्यात होणाऱ्या निवडणूकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी गरीबांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत त्यांनी गरीबांना पुढील पाच वर्षे मोफत रेशन मिळत राहील, असं मोदी म्हणाले.

मोदींनी कोणती मोठी घोषणा केली?

नरेंद्र मोदींनी केलेल्या घोषणेचा देशातील 80 कोटींहून अधिक लोकांना फायदा होणार आहे. जाहीर सभा सुरु असताना मोदी म्हणाले की, “मी ठरवले आहे की, भाजप सरकार आता देशातील 80 कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देण्याची योजना येणाऱ्या पुढील 5 वर्षांपर्यंत वाढवणार आहे.”

“तुमचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव मला असे पवित्र निर्णय घेण्यासाठी शक्ती देत आले आहेत”, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गरीब नागरिकांना सुमारे पाच किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ दान करण्यात येणार आहेत.

नरेंद्र मोदी यांनी सभेत बोलत असताना काॅंग्रेसवर थेट निशाणा साधला. आजपर्यंत काॅंग्रेसने गरीबांना नुसतं फसवण्याचं काम केलं, त्यांनी कधीच गरिबांची कदर केली नाही. याशिवाय काॅंग्रेस कधी गोरगरीबांचं दुखः देखील समजू शकले नाही, असं त्यांनी म्हटलं.

“काॅंग्रेस पक्ष जोपर्यंत सरकारमध्ये राहिला, तोपर्यंत त्यांनी फक्त पैसे लुटायचं काम केलं. शिवाय काही पैसे त्यांच्या नेत्यांच्या तिजोरीत भरत राहिले, असा हल्लाबोल मोदींनी केला. पुढे ते म्हणाले की, “2014 मध्ये जेव्हा आमचं सरकार आलं, त्यावेळेस आम्ही आमच्या गोर-गरीब बंधू आणि भगिणींना पहिलं प्राधान्य दिलं.”

थोडक्यात बातम्या-

“आम्हाला जिवंत जाळण्याचा प्लॅन होता”, माजी आमदाराच्या आरोपांनी खळबळ

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसणार?, “आता उरलेले आमदार…”

‘ते 10 लाखांचे चेक्स…’; आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची सरकारकडून अवहेलना

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा