“आम्हाला जिवंत जाळण्याचा प्लॅन होता”, माजी आमदाराच्या आरोपांनी खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

बीड | राज्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) शांततेत आंदोलन चालू होतं, मात्र काही जिल्ह्यांमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या आंदोलनाची सर्वाधिक झळ बीड (Beed) जिल्ह्याला बसली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जाळपोळ झाली, आमदारांच्या घरांना आग लावण्यात आली. याबाबत राष्ट्रवादीच्या ( Nationalist Congress Party) अजित पवार गटाचे नेते अमरसिंह पंडित (Amarsinha Pandit) यांनी मोठा खुलासा केला आहे.

अमरसिंह पंडीत यांच्या घरावर 30 ऑक्टोबर रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्याबाबत अमरसिंह पंडित यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी केलेला खुलासा अत्यंत धक्कादायक असून त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत अमरसिंह पंडीत?

“घरावर हल्ला करणारे आंदोलक नव्हते. हल्लेखोर पूर्ण तयारी करु आले होते. त्यावेळी आम्ही सर्व कुटूंबीय घरातच होतो. हल्लेखोरांची पहिली फळी ही बीड जिल्ह्यातली नव्हती, त्यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब होते, त्यांनी वाती लावल्या होत्या. दुसरी फळी ही बीडच्या ग्रामीण भागातली होती. ती होस्टेलमधे शिकणारी पोरं असावीत”, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

“हल्लोखोर पूर्वतयारी करुन आले होते, त्यांनी माझ्या घराला 22 क्रमांक दिला होता. पोलिसांच्या ठरवलं असतं, तर त्यांना हल्ला थांबवता आला असता. या सगळ्या हल्ल्यामागे राजकीय नेत्याचा हात असावा”, असा दावा अमरसिंह पंडित यांनी केला आहे.

“हल्लेखोर प्रशिक्षित होते, त्यांना कोणीतरी बाहेरुन ऑपरेट करत होतं. ते बेधुंद अवस्थेत होते, ते काय करत आहेत? त्यांनाही समजत नव्हतं. त्यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब आणि फॉस्फरस होते. आम्हाला जिवंत जाळण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यांनी गाड्यांमध्ये खडी देखील भरुन आणली होती, त्याचा वापर ते बॅकअप म्हणून करत होते”, असं धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसणार?, “आता उरलेले आमदार…”

‘ते 10 लाखांचे चेक्स…’; आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची सरकारकडून अवहेलना

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा