चुकीला माफी नाही… ‘या’ सरपंचाच्या बडतर्फीची थेट जगात चर्चा!!!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

हिंगोली | सरपंचपदाला सध्याच्या काळात चांगलंच महत्त्व आलं आहे. सरपंचपद मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी लोक कुठल्या थराला जातील हे काही सांगता येत नाही. अशाच काळात आता महाराष्ट्राच्या एका ग्रामपंचायतीची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. कारण एका क्षुल्लक चुकीमुळे या ग्रामपंचायतीच्या फॉरेन रिटर्न सरपंचाला आपलं पद गमवावं लागलं आहे.

नेमका काय आहे प्रकार?

हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस वणी गावाची (Digras Vani Gaon) सध्या राज्याच्या राजकारणात एकच चर्चा आहे, त्याला कारणही तसंच आहे. या गावच्या सरपंच डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे (Dr. Chitra Anil Kruhe) या  फॉरेन रिटर्न सरपंच म्हणून प्रसिद्ध होत्या, मात्र त्यांना आपलं सरपंचपद गमवावं लागलं आहे.

चित्रा कऱ्हे यांनी स्वीडनमध्ये आपलं उच्चशिक्षण पूर्ण केलं, त्यांनी राज्यशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. संपूर्ण कुटुंबासह स्वीडनमध्ये वास्तव्यास असतानाही त्यांना ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्याची भूरळ पडली. गावची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांनी स्वीडनमधून गावात येत थेट निवडणुकीचा फॉर्मच भरला. विशेष बाब म्हणजे त्यांनी ही निवडणूक जिंकली सुद्धा आणि त्या गावच्या सरपंचही झाल्या.

असं असलं तरी एका क्षुल्लक चुकीमुळे त्यांना आपल्या सरपंचपदावर पाणी सोडावं लागलं आहे. हिंगोलीच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. चित्रा कुऱ्हे यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांनी निवणुकीच्या नियमांचे पालन केले नाही म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीचा हिशोब सादर केला नाही, त्यामुळे त्यांना सरपंचपदावरुन बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, डिग्रस वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ( Vanchit Bahujan Aghadi ) पुरस्कृत पॅनलने त्यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणुक लढवली होती. त्यांच्या पॅनलने नऊपैकी आठ जागांवर विजय मिळवला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तींना मिळणार कुणबी प्रमाणपत्र

सेमी फायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का!

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा