उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसणार?, “आता उरलेले आमदार…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | आमदार अपात्रते प्रकरणी 31 डिसेंबर पुर्वी अंतिम सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना दिले आहेत. त्यामुळे राहूल नार्वेकरांनी सुनावणी घेण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणी सातत्याने शिवसेनेचे (Shivsena) ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांवर टीका करत आहे. अशातच शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट (sanjay shirsat) यांनी मोठा दावा केला आहे.

संजय शिरसाट माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, संजय राऊत (Sanjay Raut) पोपटाच्या आणि दलालाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांनी निकालाची चिंता करु नये. सरकार जाणार नाही. त्यांचे 15 आमदार शिंदे गटात येणार आहेत. हे निश्चित सांगतो, असा दावा सजंय शिरसाटांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. सेनेच्या 40 आमदारांसह त्यांनी गुवाहाटी गाठली. ठाकरे गटाकडे 15 आमदार शिल्लक आहेत. ते ही ठाकरे गटाची साथ सोडणार आहेत, असं संजय शिरसाटांनी सांगितलं आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस काय होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आमदार अपात्रतेच्या प्रकरणात राहूल नार्वेकर यांनी सुनावणी घेण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणी 36 याचिकांची 6 याचिकांमध्ये वर्गिकरण करण्यात आलं आहे. पुढिल सुनावणी 26 नोव्हेंबरला आहे. आमदार आपात्रतेच्या प्रकरणात काय निकाल लागणार? याकडे संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

‘ते 10 लाखांचे चेक्स…’; आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची सरकारकडून अवहेलना

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा

भाजपविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय?, ही घटना आहे धोक्याची घंटा!

भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची महिलेनं केली मोठी फजिती