सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी!, उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबलच्या जागा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sarkari Naukri 2023 | सरकारी नोकरीची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे. भारत सरकार (Government Job) गृहमंत्रालयाच्या अधिकारात असलेल्या सीमा सुरक्षा दलाने आपल्या विभागासाठी पदभरती सुरु केली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या वॉटर विंगमध्ये ही भरती करण्यात येणार आहे. विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यामुळे या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यामध्ये अर्ज करू शकतात.

सीमा सुरक्षा दलामध्ये सुरु करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये ( Sarkari Nokari 2023 ) विविध पदांच्या एकूण जागांची संख्या ही 166 इतकी आहे, त्यामुळे एवढ्या जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल अशा पदांच्या जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

सरकारच्या या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत पोहोचतील, अशा पद्धतीने आपले अर्ज पाठवणे बंधनकारक आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी ( Sarkari Naukri 2023 ) खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. Sarkari Naukri 2023 Send Application- महानिरीक्षक (कर्मचारी), महासंचालनालय, बीएसएफ, ब्लॉक क्र. 4, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- 110003

दरम्यान, या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकता.

संपूर्ण जाहिरात पाहा- Sarkari Naukri 2023- https://drive.google.com/file/d/1KC14UMsT_oyj7CKzGeOUseYE5lle69HJ/view

महत्वाच्या बातम्या – 

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसणार?, “आता उरलेले आमदार…”

‘ते 10 लाखांचे चेक्स…’; आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची सरकारकडून अवहेलना

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा