नागपूर | भाजपचे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अशोक नेते हे सुदैवाने या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. ते सुखरुप आहेत.
मुंबईतली बैठक आटोपून अशोक नेते रात्री उशिरा नागपूरला दाखल झाले होते. रात्री जास्त उशिर झाल्यामुळे ते आपल्या घरी गडचिरोलीला जाऊ शकले नाहीत. त्यांनी नागपुरात मुक्काम केला. त्यानंतर ते आज सकाळी त्यांच्या गाडीने नागपूरहून गडचिरोलीला निघाले होते.
या दरम्यान आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीचा अपघात झाला. गाडीची अवस्था पाहिल्यावर गाडी किती वेगात होती याचा अंदाज येईल. सध्या खासदार त्यांच्या मतदारसंघात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
टीप्पर कारची जोरात धडक
अशोक नेते हे 3 नोव्हेंबरला मध्यरात्री मुंबईतून नागपूरला पोहोचले. नागपूर येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करून 4नोव्हेंबरला सकाळी ते गडचिरोलीला जाण्यासाठी निघाले. विहिरीगावजवळ त्यांच्या वाहनासमोर अचानक टिप्पर आले आणि समोरासमोर जोराची धडक झाली. यावेळी खासदार नेते यांच्यासह चालक, दोन सुरक्षारक्षक आणि अन्य एक असे पाच जण वाहनात होते.
अशोक नेते यांच्यासह चालक, दोन सुरक्षारक्षक व अन्य एक असे पाच जण वाहनात होते. गाडीत बसलेल्या कोणालाही कसलीही दुखापत झाली नाही. अशोक नेते हे सुरक्षित असल्याची माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी!, उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबलच्या जागा
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसणार?, “आता उरलेले आमदार…”
‘ते 10 लाखांचे चेक्स…’; आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची सरकारकडून अवहेलना
खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा
जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा