ड्रग्स प्रकरणात भाजपच्या मंत्र्याचा हात?; ‘या’ नेत्याच्या आरोपांनी खळबळ

पुणे | ड्रग्स माफिया ललित पाटीलला दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात ललितला मदत करणाऱ्या 17 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ललितबद्दल आता एक मोठी अपडेटसमोर आली आहे.

ससून रुग्णालयाचे डीन डाॅ. संजीव ठाकूर यांनी ललितचा मुक्काम वाढावा यासाठी त्याच्या उपचाराचे दिवस वाढवल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आता आणखी एक गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी डाॅ. ठाकूर यांच्यावर केला आहे.

डाॅ. ठाकूर यांच्यावर कोणता आरोप करण्यात आलाय?

काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, “ललित पाटीलचे संबंध हे भाजपच्या एका मंत्र्यासोबत आहेत. हा मंत्री गुन्हेगारी विश्वात फिरतो, गुन्हेगारांबरोबर राहतो, त्याचे गुन्हेगारांबरोबर संबंध आहेत, निवडणुकीत गुन्हेगारांचा वापर करतो, असा भाजपचा एक मंत्री आहे.”

“मी हे आज नाही तर पहिल्या दिवसापासून बोलतोय. या मंत्र्याकडून ससूनचे डीन संजीव ठाकूर यांनी प्रचंड पैसे घेतले आहेत. हे पैसे हवाला आणि गुन्हेगारांमार्फत घेतले आहेत”, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय. दरम्यान केलेल्या आरोपांवर डाॅ. संजीव ठाकूर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

डाॅ. संजीव ठाकूर म्हणाले की, “आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करु. मला कोणत्या मंत्र्याचा फोन आला नाही. सगळे आरोप चुकीचे आहेत.” दुसरीकडे ललित पाटील याच्यासह संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट करा. ललित पाटीलचे संबंध भाजपच्या मंत्र्यांसोबतही आहेत, असा प्रत्यारोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या-

मनोज जरांगे यांच्या तब्येतीबद्दल चिंताजनक माहिती समोर

मोठी बातमी! मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय 

‘ते 10 लाखांचे चेक्स…’; आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची सरकारकडून अवहेलना

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा