बीडमध्ये घरं पेटवलेल्या आंदोलकांचं आता काही खरं नाही… धनंजय मुंडे अॅक्शनमध्ये…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

बीड | मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation ) प्रश्नावर महाराष्ट्रात मोठं आंदोलन झालं. राज्यभर हे आंदोलन शांततेत चालू होतं, मात्र मराठवाड्यात काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या आंदोलनाची सर्वात जास्त झळ बीड (Beed) जिल्ह्याला बसली.  एसट्यांवर दगडफेक करणे, कार्यलयांना आणि आमदारांच्या घराला आग लावणे, अशा घटना घडल्या. याबाबत राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांनी धक्कादायक दावा  केला आहे.

धनंजय मुंडे यांनी जाळपोळीच्या घटना घडलेल्या ठिकाणांचा आज पाहणी दौरा केला, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी अनेक धक्कादायक दावे केलेत. आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांचे घर पेटवले, त्यानंतर माझे देखील घर जाळण्याची भाषा बोलली गेली, असा धक्कादायक दावा धनंजय मुंडेंनी केला आहे.

“ज्या घरांवर हल्ले करायचे त्या घरांना नंबर दिले गेले होते. ठराविक ठिकाणांवर जाणून-बुजून हल्ले केले गेले. नेत्यांची घरे,आॉफिस, संस्था जाळणे, दगडफेक करणे हे ठरवून केले गेले. हे एक मोठे षडयंत्र होते. अचानक झालेल्या घटनांनी पोलिस सुद्धा हतबल झाले होते”, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

“या घटना ठरवून केल्या गेल्या आहेत. आज पाहणी केल्यानंतर हे माझ्या लक्षात आलं आहे. या घटनांना जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. मी  मंगळवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणार आहे. या घटनांची चौकशी व्हावी, यासाठी त्यांच्याकडे विशेष तपास पथकाची नेमणूक करण्याची मागणी करणार आहे”, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

दरम्यान, गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडीत (Amarsinha Pandit) यांनी या घटनेबद्दल काल अत्यंत धक्कादायक दावे केले होते. हल्ला करणारे मराठा आंदोलक नव्हते, ते हल्लेखोर नियोजन करुन आले होते. त्यांचा आम्हाला जिवंत जाळण्याचा उद्देश होता, त्यांना बाहेरुन कोणतरी ऑपरेट करत होतं, असे अनेक धक्कादायक दावे त्यांनी केले होते.

बीडमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्यावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच नेत्यांनी बीडच्या घटना नियोजित होत्या, असे दावे केले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे, त्यामुळे आता या आरोपांची चौकशी होते की नाही?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘हा’ शेअर मोठा धमाका करण्याची शक्यता; गुंतणूकदारांची दिवाळी गोड होणार?

‘शेवटी तो माझा भाऊ आहे’; सुप्रिया सुळे थेट बोलल्या

‘तुमचे 50% कुठे…’; नाशिक लाचप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

“वेळ काळ सांगा मी लढायला तयार”, सुषमा अंधारेंचं ‘या’ नेत्याला थेट चॅलेंज

लोकांची दिवाळी गोड!, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा