‘शेवटी तो माझा भाऊ आहे’; सुप्रिया सुळे थेट बोलल्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान राज्यात आज 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. यावेळी अजितदादांचं गाव असलेल्या काटेवाडीत अजित पवार यांच्या आई आशाताई पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.

माध्यमांशी बोलत असताना अजित दादांच्या आई म्हणाल्या की, मी आता 86 वर्षांची आहे. 1957 पासून मी मतदान करत आले आहे. लोकांनाही वाटते अजित दादा मुख्यमंत्री व्हावं. माझ्या डोळ्या देखत दादाने राज्याचे मुख्यमंत्री व्हावं, ही माझी सुद्धा इच्छा आहे, असं त्या म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या की, बारामतीमध्ये लोकांचं भरभरून प्रेम मिळालं. बारामती मधील जनता आमच्या सोबत आहेत.

याच पार्श्वभूमी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या आईंने केलेल्या वक्तव्यावर एका ओळीत प्रतिक्रिया दिली. पुण्यातील एका कार्यक्रमावेळी माध्यामांशी बोलत असाताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

आशाताई पवार यांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अर्थातच कोणत्याही आईला आपल्या मुलाने मुख्यमंत्री व्हावं, असं वाटतंच. पुढे त्यांनी अजितदादा यांच्या आजारपणावर सुद्धा भाष्य केलं. आजार होतो तेव्हा माणसाने आराम करायचा असतो. मला माहिती आहे. अजित दादांना आरामाची गरज आहे.

आरोग्यमध्ये राजकारण आणणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. हे माझं वैयत्तीक मत आहे. दादांची चौकशी रोजच करते. बर झाल्यावर मी त्याला भेटायला जाणार आहे. शेवटी तो माझा भाऊ आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या- 

‘तुमचे 50% कुठे…’; नाशिक लाचप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

“वेळ काळ सांगा मी लढायला तयार”, सुषमा अंधारेंचं ‘या’ नेत्याला थेट चॅलेंज

लोकांची दिवाळी गोड!, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा

“आम्हाला जिवंत जाळण्याचा प्लॅन होता”, माजी आमदाराच्या आरोपांनी खळबळ

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसणार?, “आता उरलेले आमदार…”