याची देही याची डोळा!, रेकॉर्डब्रेक लोकांनी पाहिला ‘विराट’ सोहळा!

कोलकाता | किंग विराट कोहलीचा (Virat Kohli) आज वाढदिवस आहे. वाढदिवसादिवशी विराटने शानदार शतक पूर्ण केलं. कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हे 49 वं शतक आहे. या शतकासह विराट कोहलीने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली.

सचिन तेंडुलकरच्या नावावर वनडे फॉरमॅटमध्ये 49 शतकं आहेत. दरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आपल्या वाढदिवशी शतक करणारा पहिला सक्रीय आणि एकूण तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

इतिहासातील सर्वात मोठा आकडा 

बर्थडेला विराट कोहली (Virat Kohli) सचिनच्या विक्रमाची बरोबरी करणार का? याचीच चर्चा रंगली होती. आज बर्थडे असल्याने विराटने हा भीम पराक्रम करावा, अशीच मनोकामना प्रत्येक भारतीयाची होती. किंग कोहलीनं आज संयमी खेळी करत हा पराक्रम गाठला.

विराटने शतकी धाव घेतल्यानंतर तोच प्रसंग आजवरच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला आहे. तब्बल 4.40 कोटी लोकांनी श्वास रोखून धरला होता. हा आकडा आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा आकडा आहे.

विराटच्या आधी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या 2 भारतीयांनी ही कामगिरी केली. कांबळीने 1993 मध्ये इंग्लंड विरूद्ध नाबाद 100 धावा केल्या. तर सचिनने 1998 ला ऑस्ट्रेलिया विरूद्ध 134 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता विराटने ही कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

बीडमध्ये घरं पेटवलेल्या आंदोलकांचं आता काही खरं नाही… धनंजय मुंडे अॅक्शनमध्ये…

‘हा’ शेअर मोठा धमाका करण्याची शक्यता; गुंतणूकदारांची दिवाळी गोड होणार?

‘शेवटी तो माझा भाऊ आहे’; सुप्रिया सुळे थेट बोलल्या

‘तुमचे 50% कुठे…’; नाशिक लाचप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

“वेळ काळ सांगा मी लढायला तयार”, सुषमा अंधारेंचं ‘या’ नेत्याला थेट चॅलेंज