जरांगे पाटलांच्या आंदोलनात लाठीचार्ज करण्याचा आदेश कुणाचा? मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन तूर्तास थमलं आहे, मात्र आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनावर झालेला लाठीचार्ज मराठा समाज अद्याप विसरलेला नाही. आरक्षणासाठी मराठा बांधवांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, काही पोलिसांना देखील जखमी व्हावं लागलं. यासंदर्भात एक गोष्ट कायमच चर्चेत राहिली, ती म्हणजे या आंदोलनादरम्यान लाठीचार्जचा आदेश नेमका कुणी दिला?. यासंदर्भातच आता एक मोठा खुलासा समोर आला आहे.

आंतरवाली सराटीमध्ये घडलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतरच मराठा आंदोलनाला खऱ्या अर्थाने व्यापक रुप आलं. तो लाठीचार्ज का करावा लागला? कुणाच्या आदेशाने हा लाठीचार्ज झाला? या सगळ्या प्रश्नांची अधिकृत उत्तरं आता जालन्याचे तत्कालीन एसपी तुषार दोशी यांनी दिली आहेत.

नेमकं काय म्हणाले आहेत तुषार दोषी?

“मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्यासाठी अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले होते. या आंदोलनादरम्यान ते पाणी पीत नव्हते, एवढंच नव्हे तर थुंकी सुद्धा गिळत नव्हते. अन्नपाण्याचा त्याग केल्याने त्यांची प्रकृती खालवत चालली होती. आम्हाला डॉक्टरांनी या गोष्टीची कल्पना दिली होती.”

“दरम्यान, सरकारी डॉक्टरांनी चेक करुन त्यांना एक प्रमाणपत्र दिलं होतं. यामध्ये त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्यांच्यावर उपचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. जेव्हा आमच्या अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांना उपचाराकरता नेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी मराठा कार्यकर्ते जास्तच आक्रमक झाले, ते थेट अंगावर आले. त्यामुळे लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर मोठी दगडफेक झाली, असा दावा दोषी यांनी केलाय.

आंदोलक आक्रमक झाल्याने स्वतःचा जीव वाचवणे आणि परिस्थिती शांत करण्यासाठी प्लॅस्टिकच्या बुलेट आणि अश्रूधुरांचा वापर करण्यात आला. या सर्व गोंधळात आमचे अधिकारी जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहचू शकले नाही. आमचा फक्त त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न होता. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की यामध्ये कोणताही आदेश आम्हाला आलेला नव्हता. स्थानिक पोलिसांनी परिस्थिती पाहून तो निर्णय घेतला होता, असा खुलासा दोषींनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

याची देही याची डोळा!, रेकॉर्डब्रेक लोकांनी पाहिला ‘विराट’ सोहळा!

बीडमध्ये घरं पेटवलेल्या आंदोलकांचं आता काही खरं नाही… धनंजय मुंडे अॅक्शनमध्ये…

‘हा’ शेअर मोठा धमाका करण्याची शक्यता; गुंतणूकदारांची दिवाळी गोड होणार?

‘शेवटी तो माझा भाऊ आहे’; सुप्रिया सुळे थेट बोलल्या

‘तुमचे 50% कुठे…’; नाशिक लाचप्रकरणी धक्कादायक माहिती समोर