फक्त एकच अशी गोष्ट, ज्यामुळे भारताचा होतोय सलग विजय!

मुंबई | भारतीय संघ सध्या जगातील सर्वोत्त टीमपैकी एक मानली जाते. वनडे वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने धमाकेदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाचा विजय रथ आतापर्यंत कोणालाही रोखता आलेला नाही.

विश्वचषकात भारतीय गोलंदाजांची ताकद जगाने पाहिली आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय फलंदाजांनी भल्या-भल्या फलंदाजांची सुट्टी केली आहे. हे तुम्हाला आकडेवारीतूनच स्पष्ट दिसेल.

यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत जसप्रित बुमराहने सर्वाधिक 14 विकेट घेतल्या आहे. त्यामागे दुसऱ्या क्रमांकावर कुलदीप यादवने दहा बळी घेतले आहे. वर्ल्ड कप 2023 मध्ये मोहम्मद शामीने आतापर्यंत 9 विकेट घेतल्या आहेत, तर जाडेजाने 8 विकेट आणि मोहम्मद सिराजने सहा विकेट घेतल्या आहेत.

गोलंदाजांमुळे भारताला गेल्या दोन मॅच सहज जिंकता आल्या. जसप्रित बुमराह, शामी, सिराजने, जाडेजा यांनी भेदक गोलंदाजी केली. भारतीय खेळाडूंचा धस्ता भल्या भल्या चांगल्या टीमने या विश्वचषकात घेतल्याचं पाहायला मिळलं.

वर्ल्डकप 2023 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. टीम इंडिया 14 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. भारताच्या अजून दोन लढती शिल्लक असून साखळी फेरी संपल्यानंतर ते अव्वल स्थानी राहण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

बीडमध्ये घरं पेटवलेल्या आंदोलकांचं आता काही खरं नाही… धनंजय मुंडे अॅक्शनमध्ये…

‘हा’ शेअर मोठा धमाका करण्याची शक्यता; गुंतणूकदारांची दिवाळी गोड होणार?

‘शेवटी तो माझा भाऊ आहे’; सुप्रिया सुळे थेट बोलल्या

‘तुमचे 50% कुठे…’; नाशिक लाचप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

“वेळ काळ सांगा मी लढायला तयार”, सुषमा अंधारेंचं ‘या’ नेत्याला थेट चॅलेंज