दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!

नवी दिल्ली | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 हप्त्यांचे पैसे जमा झाले आहेत. आता 15 वा हफ्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशात शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज समोर आलीये. दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचं कळतंय.

पंधराव्या हप्त्यादरम्यानही मोठ्या प्रमाणात अपात्र शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली जाऊ शकतात, असं मानलं जात आहे. सरकार या शेतकऱ्यांना पैसे परत करण्यासाठी सातत्याने नोटिसा पाठवत आहे. पैसे परत न केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

15 हप्ता लवकरच मिळणार

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये दर चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात.

सध्या 14 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतकरी 15 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील हप्त्यांमध्ये, पीएम किसानच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं दिसून आले आहे. त्यामागचे कारण जमिनीच्या नोंदींची पडताळणी असल्याचे सांगितलं जात आहे.

पंधराव्या हप्त्यादरम्यानही मोठ्या प्रमाणात अपात्र शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली जाऊ शकतात, असे मानले जात आहे. सरकार या शेतकऱ्यांना पैसे परत करण्यासाठी सातत्याने नोटिसा पाठवत आहे. पैसे परत न केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या- 

एकनाथ खडसेंना नेमकं झालं काय?, चिंताजनक माहिती समोर!

‘हा’ शेअर मोठा धमाका करण्याची शक्यता; गुंतणूकदारांची दिवाळी गोड होणार?

‘शेवटी तो माझा भाऊ आहे’; सुप्रिया सुळे थेट बोलल्या

‘तुमचे 50% कुठे…’; नाशिक लाचप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

“वेळ काळ सांगा मी लढायला तयार”, सुषमा अंधारेंचं ‘या’ नेत्याला थेट चॅलेंज