एकनाथ खडसेंना नेमकं झालं काय?, चिंताजनक माहिती समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जळगाव | माजी मंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांना दुपारच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला आहे. जळगाव येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. खडसे यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची माहितीसमोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ खडसेंच्या छातीत दुखत होतं. आज त्रास वाढल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले डॉक्टर?

एकनाथ खडसे यांच्यावर जळगावमध्ये उपचार सुरु आहेत. गजानन हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय. येथील डाॅ. विवेक चौधरींनी त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. खडसे यांची प्रकृती स्थीर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसापासून त्यांच्या छातीत बर्निंग सेंच्युरीनचा त्रास होता. ते रुटीन चेकअपसाठी आले होते. त्यांचा रक्तदाब स्थिर आहे. रक्तातील साखरही स्थिर आहे.

खडसेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बाब कोणती?

डॉक्टरांनी एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबद्दल एक चिंताजनक बाब सांगितली आहे. डाॅ. चौधरी म्हणाले की, “खडसेंच्या छातीत थोडं कंजेशन आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुढील उपचार करण्याची गरज आहे. अॅन्जिओग्राफी वगैरे करावी लागणार आहे. चेस्ट इन्फेक्शनची ट्रीटमेंट लागू शकते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाले आहेत. त्यामुळे त्यांना पुढच्या उपचारासाठी मुंबईला नेण्यात येणार आहे.”

थोडक्यात बातम्या-

‘हा’ शेअर मोठा धमाका करण्याची शक्यता; गुंतणूकदारांची दिवाळी गोड होणार?

‘शेवटी तो माझा भाऊ आहे’; सुप्रिया सुळे थेट बोलल्या

‘तुमचे 50% कुठे…’; नाशिक लाचप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

“वेळ काळ सांगा मी लढायला तयार”, सुषमा अंधारेंचं ‘या’ नेत्याला थेट चॅलेंज

लोकांची दिवाळी गोड!, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा