सिंधुदुर्ग | राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांसाठीचं मतदान सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावात म्हणजेच काटेवाडीत त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्या पत्नीने मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अजित पवार यांच्या आईने आपली एक इच्छा व्यक्त केली, मात्र त्यावर आता शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या होत्या अजित पवारांच्या मातोश्री?
काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजित पवार यांची आई आशाताई यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असं मला वाटतं. माझ्या डोळ्यादेखत मला त्यांना मुख्यमंत्री झालेलं बघायचा आहे.”
अजित पवार यांच्या आईंनी केलेल्या या वक्तव्यावर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेची एकच चर्चा होताना दिसत आहे.
नेमकं काय म्हणाले दिपक केसरकर?
मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आणि आकांक्षा कुणाला असण्यामध्ये काही चुकीचं नाही, परंतु एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचाच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार आहे. अजित दादांचे वय लहान आहे. त्यांना पुढच्या काळात ही संधी मिळू शकते. दीपक केसरकर यांच्या या प्रतिक्रियेनंतर उलटसूलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
आणखी कोणकोण काय काय म्हणाले?
“कोणत्याही आईला आपल्या मुलाला मुख्यमंत्री झालेलं बघायला आवडेल”, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. “अजितदादांच्या स्वप्नांसाठी आईची प्रार्थना असेल तर स्वाभाविक आहे. आई म्हणून त्यांच्या प्रतिक्रिया अजितदादांच्या स्वप्नाला भरारी देणाऱ्या ठरोत. अजितदादांचं मत आणि मन परिवर्तन होणार असेल तर मात्र नक्कीच आईचं स्वप्न पूर्ण होईल”, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका
Virat Kohli | विराट कोहलीच्या संपत्तीचा आकडा समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे
‘माझ्या डोळ्यांसमोरच…’; अजित पवारांच्या मातोश्रींनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा
सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तींना मिळणार कुणबी प्रमाणपत्र
सेमी फायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का!