‘माझ्या डोळ्यांसमोरच…’; अजित पवारांच्या मातोश्रींनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, असं त्यांच्या कार्यकर्त्यांना नेहमी वाटतं. त्यांच्या कार्यकर्त्यांनकडून त्यांचा ‘भावी मुख्यमंत्री  अनेक वेळा उल्लेख केला जातो. अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील मुख्यमंत्री पदाची इच्छा अनेकवेळा बोलून दाखवली आहे. आता त्यांच्या मातोश्री आशाताई पवार (Ashatai Pawar) यांनीही अजित पवार मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

राज्यभरात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधूमाळी सुरु आहे. बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान पार पडत आहे. अजित पवार यांचं गाव असलेले काटेवाडीत ग्रामपंचायतीच्या (Katevadi Grampanchayat) निवडणुकीचं  मतदान होत आहे. त्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra pawar) आणि मातोश्री आशाताई पवार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी आशाताई पवार यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली.

आशाताई पवार म्हणाल्या, राज्यातील खूप लोकाचं अजितदादांवर प्रेम आहे. पुढे काय होईल सांगता येत नाही. माझं 84 वय झालं आहे. त्यामळे माझ्या डोळ्यांसमोरच दादांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छ त्यांनी बोलून दाखवली. ही इच्छा पुर्ण होईल का नाही? लोकांचं काही सांगता येत नाही, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

मी काटेवाडीत (Katewadi) 1957 पासून मतदानाचा हक्क बजावत आहे. काटेवाडीत तेव्हा काहीच नव्हते. पुर्वीच्या काटेवाडीत आणि आताच्या काटेवाडीत खूप बदल झाला आहे. यासाठी अनेकांनी हातभार लावले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, अजित पवार काटेवाडीच्या ग्रामपंचायत मतदानासाठी हजर राहिले नाहीत. त्यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यामुळे ते मतदानासाठी हजर राहू शकले नाहीत. काटेवाडी ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी आज  मतदान पार पडत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तींना मिळणार कुणबी प्रमाणपत्र

सेमी फायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का!

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा