गुणरत्न सदावर्ते पुन्हा अ‌ॅक्शन मोडमध्ये, दिला ‘हा’ नवा इशारा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | येत्या 10 नोव्हेंबरला दिवाळीचा सण आहे. बाहेर गावी नोकरीला, शिक्षणाला असणारी लोकं दिवाळीला आवर्जुन गावाकडे जात असतात. अशातच ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. एसटी कष्टकरी जनसंघाचे प्रमुख गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavrte ) यांनी एसटी बंदची हाक पुकारली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी बंदची हाक पुकारल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी उद्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर एसटी कामगारांचं आंदोलन पुकारलं आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहेत. याबाबतची नोटीस त्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (The Maharashtra State Road Transport Corporation) दिली आहे.

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु करण्याबाबत नवीन समिती स्थापन करावी, त्या समिती समोर कर्मचाऱ्यांना मत मांडण्याची सुविधा द्यावी, महांडाळाला राज्य सरकारमध्ये विलीन करावं, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सहभागी होणार असल्याचं बोलले जात आहे.

मागच्या वर्षी एयसटी कामगारांच्या आझाद मैदानावरील झालेल्या आंदोलनाचा मोठा फटका महामंडाळाला आणि प्रवाशांना बसला होता. त्यामुळे एसटी प्रशासन  अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. सोमवारी आणि मंगळवारी एसटीच्या आधिकाऱ्यांना मुख्यलयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मागच्या वर्षी एसटी कामगारांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्या आंदोलनाचा मोठा फटका महामंडाळाला बसला होता. प्रवाशांना देखील त्या आंदोलनाचा त्रास सहन करावा लागला होता. महामंडाळाचं कोट्यवधी रुपायांचं नुकसान झालं होतं. त्यावेळी अनेक दिवस एसट्या बंद होत्या.

दिवाळी तोंडावर आली आहे. अशातच पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्तेंनी एसटी बंदची हाक दिली आहे. त्यामुळे एसटी कामगार सणासुदीच्या काळात रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार काय? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘माझ्या डोळ्यांसमोरच…’; अजित पवारांच्या मातोश्रींनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा 

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तींना मिळणार कुणबी प्रमाणपत्र

सेमी फायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का!

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा