नवी दिल्ली | पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला जातोय. या प्रचारादरम्यान छत्तीसगडमधून एक धक्कादायक आणि सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
नेमका काय प्रकार घडला आहे?
छत्तीसगडमध्ये भाजपच्या एका बड्या नेत्याची हत्या करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाआधीच हत्येची ही घटना घडली आहे. या घटनेमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांनी थेट भाजप नेत्याला टार्गेट केलं आहे. त्यांनी भाजप नेत्यावर गोळ्या झाडत हत्या केली आहे, त्यामुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रतन दुबे यांची हत्या करण्यात आलीय. रतन दुबे हे पक्षाच्या प्रचारासाठी गेले होते. यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. संबंधित घटना ही नारायणपूर विधानसभा मतदारसंघातील कौशलनगर परिसरात घडली आहे.
रतन दुबे हे नारायणपूरचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष होते. तसेच ते मालवाहन परिवहन संघाचे जिल्हाध्यक्षदेखील होते. ते कौशलनगर बाजार या परिसरात भाजपच्या प्रचारासाठी गेले होते. तिथून परतत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
दरम्यान, नक्षलवाद्यांनी भाजप नेत्यावर हल्ला करण्याची ही पहिली घटना नाही. याआधीदेखील नक्षलवाद्यांनी मानपूर-मोहला परिसरातही भाजप नेत्याची हत्या केली होती. त्यानंतर वारंवार अशा घटना होत असल्याने भीती व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लोकांची दिवाळी गोड!, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा
“आम्हाला जिवंत जाळण्याचा प्लॅन होता”, माजी आमदाराच्या आरोपांनी खळबळ
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसणार?, “आता उरलेले आमदार…”
‘ते 10 लाखांचे चेक्स…’; आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची सरकारकडून अवहेलना
खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा