‘अरे ए उद्धव हे शिकून घे’; सदावर्तेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अॅड गुणरत्न सदावर्ते गेले काही दिवस वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे ते वादात सापडले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी सदावर्ते यांच्या गाडयांवर हल्ला केला होता. मात्र सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी जनसंघातील कर्मचारी संप पुकारणार असल्याची चर्चा आहे.

अॅड सदावर्ते यांनी ऐन दिवाळीमध्ये एसटी बसचा संप पुकरला आहे. एसटी कष्टकरी जनसंघातील कर्मचारी आजपासून संप पुकारणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या आंदोलनासाठी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी यासंदर्भात आज शिवेसनेचे नेत आणि मंत्री उदय सामंत यांची या आंदोलनासंदर्भात भेट घेतली असून त्यांच्यात चर्चाही झाली. यापूर्वी माध्यमांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका आहे.

काय म्हणाले सदावर्ते?

सदावर्ते म्हणाले, मला राज्याला सांगायचं आहे की, लोकभिमुख सरकार काय असतं हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी शिकून घेतलं पाहिजे. आज एसटीचं आंदोलन पुकारणार होतो. पण यापूर्वीच कष्टकऱ्यांना चर्चेला बोलवायचं असतं. हे शिकून घेतलं पाहिजे उद्धव…

124 मागण्यांसाठी ज्या कष्टकऱ्यांनी वीरमरण पत्कराले होते, त्यांना कधीही चर्चेला बोलवलं नव्हतं. मात्र आंदोलन सुरु होण्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेला बोलवलं असल्याचं सदावर्तेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लीपवरून नवा वाद, जरांगे भडकले

रश्मिका मंदानाचा नको त्या अवस्थेतला व्हिडीओ व्हायरल; पाहून तुम्हालाही बसेल धक्का

कालीचरण महाराजांची राजकारणात एन्ट्री?; घेतला मोठा निर्णय

भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबा

मोठी बातमी! ऐन दिवाळीत छत्री घेऊन बाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा