कालीचरण महाराजांची राजकारणात एन्ट्री?; घेतला मोठा निर्णय

सोलापूर |धार्मिक गुरु कालीचरण महाराज कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात. दरम्यान त्यांनी निवडणूक लढवण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले कालीचरण महाराज?

कालीचरण महाराज हे सोलापूर दौऱ्यावर आले होेते. यावेळी सोलापूरमधील शिवस्मारक सभागृहात महाराजांनी हिंदू समाजातील बांधवाना मार्गदर्शन करत भाषण केलं. भाषण झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

माध्यमांशी बोलताना महाराज म्हणाले की, मला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. जर जनतेची इच्छा असेल तर मी जरूर निवडणूक लढवेन, असं कालीचरण महाराज म्हणाले. पुढे त् म्हणाले की, मी खूप कडवा आहे, मला तिकीट कोण देणार?.

राजकारणात कडवे लोक चालतील का? मी स्पष्टपणे आणि सत्य बोलणारा व्यक्ती आहे, असं देखील महाराज म्हणाले. धर्माच्या नावावर हिंदूना एकत्रित आणण्याचा कार्य करत आहे.

कट्टर लोक आमदार किंवा खासदार झाला तर नक्कीच हिंदू समाजाचा उद्धार होईल. त्यासाठी माझे प्रयत्न आहेत. आम्ही राजा बनणारे लोक नसून राजा बनवणारे आहोत, असे कालीचरण महाराज यांनी सांगितले.

थोडक्यात बातम्या- 

भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबा

मोठी बातमी! ऐन दिवाळीत छत्री घेऊन बाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा

मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, आता केली ‘ही’ मोठी घोषणा!

याची देही याची डोळा!, रेकॉर्डब्रेक लोकांनी पाहिला ‘विराट’ सोहळा!

बीडमध्ये घरं पेटवलेल्या आंदोलकांचं आता काही खरं नाही… धनंजय मुंडे अॅक्शनमध्ये…