मोठी बातमी! छगन भुजबळांच्या ऑडिओ क्लीपने राजकारणात खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नाशिक | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचं एका कार्यकर्त्यासोबत कथित संभाषण झालं. या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात भुजबळ कार्यकर्त्यांना करो या मरोचा सल्ला देताना दिसत आहे.

या ऑडिओ क्लीपमधील संभाषणावरुन छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्याच्या विरोधात असल्याचं दिसत आहे. यावरून पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना नमस्कार केल्यानंतर थेट विषयाला हात घातल्याचं या ऑडिओ क्लिपमधून दिसत आहे. काय नाही ती सर्व मंडळी आलेली आहेत. आपण आवाज उठवायला पाहिजे. मी तर म्हणतो आवाज उठवा, असं भुजबळ म्हणाताना दिसत आहेत.

एक तर मी कुठपर्यंत लढणार? गावागावात ज्या पद्धतीने त्यांचे बुलडोजर चाललेले आहेत, त्यात आता ओबीसी काही वाचणार नाहीत. आपण आता करेंगे या मरेंगे हेच करायला पाहिजे. आवाज द्यायला पाहिजे. असंही मरतंय आणि तसंही मरतंय. त्यांचं सगळं झाले आहे आहे. मी आता उभा रहातो, असं छगन भुजबळ म्हणताना दिसत आहेत.

त्यावर हा कार्यकर्ता म्हणतो, साहेब, त्यांनी फॅमिली घेतली म्हणजे सर्व आलेच आरक्षणात. साहेब तुम्ही निर्णय घ्या आता, कार्यकर्त्यांचं बोलणं झाल्यावर भुजबळ म्हणतात, सगळं झालं सगळं झालं. मी उभा राहतो आता.

दरम्यान, अद्याप छगन भुजबळ यांनी याविषयी कोणतेही ठोस स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे आगामी काळात छगन भुजबळ यांच्या भूमिकेमुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहणार का, हे पाहावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! ऐन दिवाळीत छत्री घेऊन बाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा

मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, आता केली ‘ही’ मोठी घोषणा!

याची देही याची डोळा!, रेकॉर्डब्रेक लोकांनी पाहिला ‘विराट’ सोहळा!

बीडमध्ये घरं पेटवलेल्या आंदोलकांचं आता काही खरं नाही… धनंजय मुंडे अॅक्शनमध्ये…