‘…म्हणून शरद पवारांनी मराठ्यांचं भविष्य गाडलं’; ‘या’ जाधवांचा धक्कादायक आरोप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आंदोलनावर सगळी चर्चा सुरु असतानाच जिजाऊंचे वंशज प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांमुळे मराठा आरक्षण गेलं असं म्हटलं आहे. नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांवर मराठा आरक्षणावरून टीका केली आहे.

‘शरद पवारांनी मराठ्यांचं भविष्य गाडलं’

शरद पवारांनी तेली आणि माळी जातींचा ओबीसींमध्ये समावेश केला. आमची त्याला काही हरकत नाही. पण मग त्यांचं शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण का पाहिलं गेलं नाही?, असा सवाल नामदेवराव जाधव यांनी केला आहे.

शरद पवार मुख्यमंत्री असताना जे काही घडलं त्याच्या चौकशीसाठी श्वेतपत्रिका काढावी. 23 मार्च 1994 हा मराठ्यांसाठी काळा दिवस ठरला आहे. याचं महत्त्वाचं कारण त्याच दिवशी शरद पवारांनी रातोरात 181 क्रमांक खोडून इतर दोन जातींचा समावेश ओबीसींमध्ये केला, असं नामदेसराव जाधव यांनी सांगितलं.

डेस्क ऑफिसरच्या सहीने दोन जाती ओबीसींमध्ये घेतल्या गेल्या. त्यांना तातडीने 14 टक्के आरक्षणही दिलं गेलं आणि त्यानंतर नोकरभरतीही झाली. ओबीसींच्या यादीत तेली आणि माळी समाज घेतल्यानंतर 23 मार्च 1994 पासून आत्तापर्यंत ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यावर मराठ्यांच्या मुलांचा हक्क होता, असं ते म्हणालेत.

आज मराठ्यांची लाखो मुलं बेरोजगार आहेत त्याला कारण हा रातोरात झालेला हा निर्णय आहे. या निर्णयाला शरद पवार जबाबदार आहेत कारण ते मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला आहे, असं सांगत त्यांनी पवारांवर निशाणा साधलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लीपवरून नवा वाद, जरांगे भडकले

रश्मिका मंदानाचा नको त्या अवस्थेतला व्हिडीओ व्हायरल; पाहून तुम्हालाही बसेल धक्का

कालीचरण महाराजांची राजकारणात एन्ट्री?; घेतला मोठा निर्णय

भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबा