‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट!

मुंबई |‘स्टार प्रवाह’ (Star Pravah) वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. मालिकेने नवं वळण घेतलं आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेची कथा 25 वर्ष पुढील दाखवणार आहेत.

गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा 20 नोव्हेंबरपासून रात्री 10 वाजता पाहायला मिळणार आहे. याचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मालिकेला ट्रोल केलं जात आहे.

आता ‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेने 25 वर्षांचा लीप घेतला आहे. यामध्ये आता जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा दाखवली जाईल. 20 नोव्हेंबरपासून हे कथानक सुरू होणार असून मालिकेची वेळही बदलली आहे.

आता ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता पाहता येईल. प्रोमोमध्ये दिसते आहे की माई अर्थात वर्षा उसगांवकर एका देवळात मशाल घेऊन जातात. माई देवीला साद घालते की गौरी-जयदीपवर 25 वर्षांपूर्वी जो अन्याय झालाय, त्यासाठी डोळे उघड. जयदीपला तू नवा जन्म देशील आणि काळ भेदून गौरीला पुन्हा या भूमीवर आणशील, असंही माई म्हणते.

दरम्यान, मालिकेच्या पुनर्जन्माच्या गोष्टीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. काय फालतूगिरी आहे, असं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलंय. ही मालिका सध्या नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ट्रोल केली जात आहे.

अरे यार नको रे यांचा पुनर्जन्म वगैरे. तेच तेच रडगाण पुन्हा पुन्हा नाही बघायचंय” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं “जगबुडी होईल पण ही मालिका काही संपणार नाही…”, असं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…म्हणून शरद पवारांनी मराठ्यांचं भविष्य गाडलं’; ‘या’ जाधवांचा धक्कादायक आरोप

‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लीपवरून नवा वाद, जरांगे भडकले

रश्मिका मंदानाचा नको त्या अवस्थेतला व्हिडीओ व्हायरल; पाहून तुम्हालाही बसेल धक्का

कालीचरण महाराजांची राजकारणात एन्ट्री?; घेतला मोठा निर्णय

भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबाला