पुणे | राज्यात 2359 गावांच्या ग्रामपंचायत निवडणूकांचा निकाल आज लागला. अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती (Baramati) तालुक्यात 31 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल सुरु आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार अजित पवाराचं (Ajit pawar) बारामती तालुक्यात वर्चस्व पहायला मिळत आहे. अशातही त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावणारा एक निकाल समोर आला आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार 31पैकी 30 ग्रामपंचायतीवर अजित पवारांच्या गटाने विजय मिळवला आहे. अशातही चांदगुडेवाडी ग्रामपंचायतीवर (Chandgudewadi Grampanchayat) भाजपाने (BJP) ताबा मिळवला आहे. अशोक गजानन खैरे (Ashok Gajanan Khaire) हे चांदगुडेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवडून आले आहेत.
बारामती हा पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. बारामतीच्या राजकारणात पवारांचा दबदबा आहे. बारामतीच्या पंचायत समिती, नगर परिषद, बारामती सहकारी बॅंक अशा सगळ्या स्थानिक संस्थामध्ये पवाराचं वर्चस्व आहे. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये नेहमीच राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळते. अशातही भाजपने चांदगुडेवाडी ग्रामपंचायतीवर विजय मिळवला. ही भाजपसाठी गुड न्यूज आहे.
चांदगुडेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह 9 जागांसाठी निवडणूक पार पडली. सरपंचपदाच्या निवडणुकीत अशोक गजानन खैरे विजय झाले. इतर नऊपैकी चार जागांवर भाजप गटाने विजय मिळवला. या विजयाची तालुकाभर चर्चा रंगली आहे.
दरम्यान, अजित पवार गटाचा राज्यभर डंका पहायला मिळत आहे. आजच्या ग्रामपंचायतीच्या निकालांमध्ये अजित पवारांचा गट दुसऱ्या स्थानावर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक होती.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने 549,शिंदे गट 214 अजित पवार गट 295, शरद पवार गट 143 , काँग्रेस 152 आणि ठाकरे गटाने 102 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवलं आहे. भाजप अव्वल स्थानावर आहे तर, ठाकरे गट पिछाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बारामतीत अजित पवारच ‘दादा’; शरद पवारांचं टेंशन वाढलं
भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबा
मोठी बातमी! ऐन दिवाळीत छत्री घेऊन बाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा
मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, आता केली ‘ही’ मोठी घोषणा!
याची देही याची डोळा!, रेकॉर्डब्रेक लोकांनी पाहिला ‘विराट’ सोहळा!