मुंबई | हॅालिवूडचे प्रसिद्ध अभिनेते रॅाबर्ट डी निरो आपल्या उत्तम अभिनयाने कायम चर्चेत असतात. जगभरात जरी त्यांची फॅन फॉलोईंग असली तरी भारतातही त्यांचा चाहता वर्ग कमी नाहीये. भारतातील बरेच तरुण आणि तरुणीसुद्धा त्यांचे जबरदस्त चाहते आहेत.
रॉबर्ट डी निरो यांना हॉलिवूडमधील एक ताकतीचा अभिनेता म्हणून बघितलं जातं. दरम्यान, रॉबर्ट डी निरो हे सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. मध्यंतरी वयाच्या 79 व्या वर्षी सातव्यांदा बाप झाल्याने ते चर्चेत आले होते. दरम्यान, रॉबर्ट डी निरो आणखी एक वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत.
कोणत्या कारणामुळे रॉबर्ट डी निरो चर्चेत आलेत?
2008 ते 2019 च्या कार्यकाळात राॅबर्ट डी यांनी एक प्रोडक्शन कंपनी सुरु केली होती. त्यामध्ये काम करणाऱ्या असिस्टंटने त्यांच्यावर फार भयंकर आरोप केले आहेत. प्रॉडक्शनमध्ये काम करणाऱ्या 41 वर्षीय ग्रॅहमने 79 वर्षीय डी निरो यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
राॅबर्ट यांच्या वागणुकीबद्दल ग्रॅहमने आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, राॅबर्ट यांच्या वागणुकीमुळे कधी कधी फार अवघडल्यासारखं व्हायचं. ग्रॅहमन यांनी केलेल्या आरोपानुसार त्या म्हणाल्या की, “ते सतत मला स्वतःची पाठ खाजवण्यास सांगायचे. तिथे पाठ खाजवण्यासाठी एक यंत्र देखील असायचे, तरी रॉबर्ट यांनी कधीच त्याचा वापर केला नाही.”
दरम्यान, ग्रॅहमने त्यांच्याकडे तक्रार केली त्यावेळेस ते म्हणाले, “तू ज्या पद्धतीने करतेस, तेच फार बरे वाटते. रॉबर्ट यांच्या या कृत्याला ग्रॅहम यांनी अश्लील म्हणत त्यांच्यावर आता गंभीर आरोप केले आहेत. शिवाय रॉबर्ट डी निरो यांनी ग्रॅहमला बऱ्याचदा शिवीगाळ केल्याचंही तिने आरोपात नमूद केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘…म्हणून शरद पवारांनी मराठ्यांचं भविष्य गाडलं’; ‘या’ जाधवांचा धक्कादायक आरोप
‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लीपवरून नवा वाद, जरांगे भडकले
रश्मिका मंदानाचा नको त्या अवस्थेतला व्हिडीओ व्हायरल; पाहून तुम्हालाही बसेल धक्का
कालीचरण महाराजांची राजकारणात एन्ट्री?; घेतला मोठा निर्णय
भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबा