पवारांच्या काटेवाडीत भाजपचा शिरकाव, पण किंग ठरले अजित पवारच!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांचं गाव असलेल्या काटेवाडी ग्रामपंचायतीच्या (Katewadi Grampanchayat) निवडणुकीकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अजित पवार हे भाजप (BJP) सोबत सत्तेत सहभागी आहेत, परंतू काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अजित पवार गट आणि भाजप आमने-सामने दिसले. त्यामुळे या निवडणुकीला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं होतं. राज्यभरात या निवडणुकीची चर्चा रंगली होती. अखेर या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत.

काटेवाडीत (Katewadi) अजित पवार गट आणि भाजप पुरस्कृत पॅनल आमने-सामने होते. दोन्ही पॅनलने जोरदार प्रचार केला. ही लढत अत्यंत चुरशीची दिसत होती. अखेर अजित पवार गटाने काटेवाडी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता राखली.

काटेवाडी ग्रामपंचायतीच्या 16 जागांसाठी निवडणूक पार पडली. अजित पवार गटाने 14 जागांवर विजय मिळवला तर, भाजप पुरस्कृत पॅनलने दोन जागांवर विजय मिळवला. अजित पवार गटाला भाजपने तगडं अव्हान दिलं होतं. अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपने दोन जागा जिंकल्या.

भाजपने पहिल्यांदाच काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. यापुर्वी भाजपला कधीच काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे या विजयाची सर्वत्र चर्चा होत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे.

संपुर्ण महाराष्ट्रात काटेवाडीला शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून  काटेवाडीच्या ग्रामपंचायतीवर पवार कुटुंबियांचं एकहाती वर्चस्व राहिलं आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनतंर ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते.

दरम्यान, बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. भाजपने पहिल्यांदाच बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला. त्यामुळे या विजयाची तालुक्यात चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लीपवरून नवा वाद, जरांगे भडकले

रश्मिका मंदानाचा नको त्या अवस्थेतला व्हिडीओ व्हायरल; पाहून तुम्हालाही बसेल धक्का

कालीचरण महाराजांची राजकारणात एन्ट्री?; घेतला मोठा निर्णय

भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबा

मोठी बातमी! ऐन दिवाळीत छत्री घेऊन बाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा