न खेळताच आऊट…. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला प्रकार… पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | क्रीझवर न येताच फलंदाज बाद झालाय. तुमचा यावर विश्वास बसत नसेल पण, हे खरंय ! क्रिकेटच्या (Cricket) इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय. एकदिवशीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (ICC Cricket Wold Cup) यंदा भारतात सुरु आहे. दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यादरम्यान श्रीलंकेचा फलंदाज क्रिझवर न येताच बाद झाला आहे. या प्रकाराची क्रिकेटच्या वर्तुळात आता एकच चर्चा रंगली आहे.

नेमका काय प्रकार घडला आहे?

बांगलादेशने  (Bnagladesh Cricket Team) नाणेफेक जिंकून श्रीलंकेला (Shrilanka Cricket Team) फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. बांगलादेशनं २५ षटकापर्यंत १३५ धावा देत श्रीलंकेचे ५ गडी बाद केले होते. आधीचा फलंदाज बाद झाल्याने श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीसाठी मैदानात आला होता, परंतु तो ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून सगळ्यांच्या भुवया उंचवल्या आहेत.

२५ वे षटक बांगलादेशचा फिरकी गोलंदाज शकीब अल हसन (Shakib All Hassan) टाकत होता. शकीबने त्याच्या दुसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमाला झेलबाद केलं. त्यानंतर मैदानावर अँजेलो मॅथ्यूज  फलंदाजीसाठी आला. त्यावेळी त्याच्याकडून एक क्षुल्लक चूक झाली, तो बाद झाला आणि स्टेडियमधील प्रेक्षक पाहतच राहिले. काय झालंय कुणाला काहीच कळत नव्हतं.

अँजलो मॅथ्यूज फलंदाजीसाठी मैदानावर आला, त्यावेळी त्याला हेल्मेटमध्ये काहीतरी समस्या जाणवली. त्याने बदली हेल्मेट आणण्याची सूचना आपल्या सहकाऱ्यांना केली. यादरम्यान, तो वेळेत क्रीझवर पोहोचू शकला नाही, त्यामुळे तो टाईम आऊटचा शिकार झाला.

शकीब अल् हसनने यासंदर्भात पंचांकडे दाद मागितली होती, त्यानंतर पंचांनी त्याला बाद घोषित करण्याचा निर्णय घेतला. पंचांच्या या निर्णयानंर मँथ्यूजने शकीब तसेच पंचांची हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आयसीसीच्या नियमानूसार आधीचा फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज दोन मिनिटात खेळपट्टीवर येऊन खेळ सुरु व्हायला हवा. नेमक्या याच निर्णयाचा फायदा शकीब तसेच बांगलादेशच्या टीमनं घेतला. मँथ्यूजकडे यानंतर आदळआपट करण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग शिल्लक नव्हता. क्रिकेटच्या वर्तुळात मात्र आता यावर उलटसूलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

“…तर कुणाला काहीच मिळणार नाही”, छगन भुजबळांचा मोठा दावा

मंत्र्याचा तोल सुटला!, नको ते कृत्य करताना व्हिडीओ व्हायरल… पाहा व्हिडीओ 

बारामती लोकसभा जिंकू म्हणणाऱ्या भाजपसाठी मोठी गुड न्यूज!

बारामतीत अजित पवारच ‘दादा’; शरद पवारांचं टेंशन वाढलं 

भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबा