“…तर कुणाला काहीच मिळणार नाही”, छगन भुजबळांचा मोठा दावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

छत्रपती संभाजीनगर | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ सध्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. दौऱ्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं.

मराठा आरक्षणाला मी किंवा माझ्या पक्षाने किंवा परिषदेने विरोध केला नाही. ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत. मराठा आरक्षण देताना कुणाच्याही आरक्षणाला धक्का देऊ नका, असं भुजबळ म्हणालेत.

आमची भूमिका ती सर्व पक्षांची भूमिका आहे. मराठा आंदोलनात नासधूस का झाली मला कळलं नाही. काही ठराविक हॉटेल आणि घरांना जाळले. तासभर लोक जाळपोळ करीत होते, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

न्यायमूर्ती जरांगे समोर सर सर करत गेले. हात जोडत गेले. आम्हाला ओबीसींना कसा न्याय मिळेल?नोंद असेल तर कुणबी प्रमाणपत्र देण्यात काहीच हरकत नाही. दोन दिवसात पुरावे कसे सापडले. एवढा मोठा समाज ओबीसीमध्ये आला तर कुणालाच काही मिळणार नाही, अशी भिती छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

समोरून द्या. महाराष्ट्र हा सर्व समाजाचा आहे. सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे चुकीचे आहे. मला ते बरोबर वाटत नाही. आज दहशत निर्माण झालेली आहे. त्यामुळे काही जण भेदरलेलं आहेत. मराठ्यांच्या बाजूने काम करीत असाल तर तुम्हाला ओबीसी मत नको आहेत?असा सवाल भुजबळांनी केलाय.

दरम्यान, जातीगणना करा, कळू द्या कोण किती आहे ते. मी कुठल्याही जातीचे नेतृत्व करत नाही. मी माळी समाजाचे सुद्धा नेतृत्व करत नाही, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

मंत्र्याचा तोल सुटला!, नको ते कृत्य करताना व्हिडीओ व्हायरल… पाहा व्हिडीओ 

बारामती लोकसभा जिंकू म्हणणाऱ्या भाजपसाठी मोठी गुड न्यूज!

बारामतीत अजित पवारच ‘दादा’; शरद पवारांचं टेंशन वाढलं 

भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबा

मोठी बातमी! ऐन दिवाळीत छत्री घेऊन बाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा