मंत्र्याचा तोल सुटला!, नको ते कृत्य करताना व्हिडीओ व्हायरल… पाहा व्हिडीओ

बर्लिन | जर्मनची राजधानी बर्लिन येथे युरोपियन युनियनची परिषद पार पडली. यावेळी वेगवेगळ्या देशातील मंत्री उपस्थित होते. याच परिषदेला क्रोएशिया देशाचे परराष्ट्र मंत्री गॉर्डन ग्रलिक रेडमन देखील हजर होते. मात्र सध्या सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या एका कृत्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत नेमकं घडलंय काय?

बर्लिन येथे झालेल्या युरोपियन युनियनच्या परिषदेसाठी जर्मनच्या परराष्ट्रमंत्री अॅनालेना बेयरबॉक उपस्थित होत्या. परिषदेतील एका सत्रानंतर सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या एकत्रित फोटोशूटचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी घडलेल्या एका प्रकारानं क्रोएशियाला शरमेनं मान खाली घालावी लागली आहे.

ग्रुप फोटो काढत असताना क्रोएशियाचे परराष्ट्र मंत्री गॉर्डन ग्रलिक रेडमन यांनी जर्मनच्या परराष्ट्रमंत्री अॅनालेना बेयरबॉक यांना जबरदस्तीनं किस करण्याचा प्रयत्न केला. व्हायरल झालेल्या व्हिडीओत हा धक्कादायक प्रकार कैद झालेला दिसत आहे. यामध्ये स्पष्ट दिसतंय की रेडमन यांनी अॅनालेना यांच्या ओठांचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

रेडमन आपल्या ओठांवर त्यांचे ओठ ठेवत असल्याचं अॅनालेना यांच्या तात्काळ लक्षात आलं, त्यांनी लगेचच आपलं तोंड फिरवलं मात्र रेडमन यांनी त्यांच्या गालांची पप्पी घेतल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या या कृत्यामुळे रेडमन यांना चांगलंच ट्रोल केलं जातंय.

दरम्यान, रेडमन यांच्या कृत्यानंतर अॅनालेना प्रचंड अस्वस्थ झाल्या असल्याच्या दिसल्या. दुसरीकडे क्रोएशियामधून त्यांच्या या कृत्याची बिभत्सना होताना दिसतेय. क्रोएशियाचे माजी पंतप्रधान जद्रानका कोसोर यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

बारामती लोकसभा जिंकू म्हणणाऱ्या भाजपसाठी मोठी गुड न्यूज!

बारामतीत अजित पवारच ‘दादा’; शरद पवारांचं टेंशन वाढलं 

भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबा

मोठी बातमी! ऐन दिवाळीत छत्री घेऊन बाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा

मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, आता केली ‘ही’ मोठी घोषणा!