छत्रपती संभाजीनगर | मराठा आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं होतं. जाळपोळीच्या अनेक घटना बीडमध्ये घडल्या. कार्यालये, आमदारांची घरे, एसटी बसेसवर दगफेक अशा घटना घडल्या होत्या. तसेच समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्या जालना रोडवर असलेल्या सनराईज हॉटेलला आग लावण्यात आली. या घटनांवरुन अरोप- प्रत्यारोप होत आहेत.
राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडचा दौरा केला. यावेळी त्यांनी हिंसक घटना घडलेल्या ठिकाणांची पाहणी केली. यावरुन मनोज जरांगे पाटलांनी सनराईज हॉटेलला छगन भुजबळ यांच्या नातेवाईकांनीच आग लावली असा गंभीर आरोप केला आहे.
बीडमधील छगन भजबळ (Chhagan bhujbal) यांच्या पाहूण्यांचे हॉटेल फोडण्यात आले. ते हॉटेल त्यांच्याच पाहूण्यांनी फोडले आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. तशी खात्रीलायक माहिती मला मिळाली आहे. मराठा समाजाची पोरं अशी तोडफोड करणार नाहीत, असं त्यांनी सांगितलं.
मराठा समाजानं शांततेत आंदोलन केलं आहे. पूर्ववैमन्यस्यातून घरं फोडली गेली. दगडफेक झाली. मराठा समाजातील मुलांचा या जाळपोळीचा काहीच सबंध नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
छगन भुजबळ हे स्वतः पोलिस अधिक्षकांकडे गेले होते. त्यांनी त्यांच्याकडे काही नावे दिली आहेत. मराठ्यांच्या पोरांना पोलिस केसेसमध्ये अडकवण्याचे षडयंत्र सुरु आहे. त्यामुळे मराठा समाजातील नेत्यांनी आपल्या पोरांसाठी पुढं यायला हवं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) अजित पवार (Ajit Pawar) यांनी छगन भुजबळांना समज द्यावी, असं मनोज जरांगे म्हणाले.
हे सगळं जाणीवपुर्वक चालू आहे. मराठ्यांच्या मुलांना पोलिस केसेसमध्ये आडकवलं जात आहे. मराठा समाज खचला गेला पाहिजे, यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत, असंही जरांगे पाटील म्हणालेत.
महात्त्वाच्या बातम्या-
मराठा आरक्षणावर बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य!
मोठी बातमी! ठाकरेंना धक्का; सगळ्यात जवळच्या नेत्याला ईडीचं समन्स
शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का!
कौतुकास्पद! मेंढपाळाच्या लेकीनं बापाचं नाव काढलं; केली ही कामगिरी
पवारांच्या काटेवाडीत भाजपचा शिरकाव, पण किंग ठरले अजित पवारच!