मुंबई | मी फोटोग्राफी करायचो. मी कधी मुख्यमंत्री होईल असा विचार केला नव्हता. मी खरं तर शरद पवारांमुळे मुख्यमंत्री झालो. मी मुख्यमंत्री होण्याला शरद पवारच जबाबदार आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
पत्रकार राहुल गडपाले यांच्या ‘अवतरणार्थ’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
मुख्यमंत्री असताना जमेल ते काम मी केलं आणि महाराष्ट्रातील जनतेनं मला स्वीकारलं. मला महाराष्ट्राच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मान मिळाला आहे. तीच माझ्या आयुष्यातील कमाई आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपवर देखील निशाणा साधला.महादेव’ बेटिंग अॅप प्रकरणावरून भूपेश बघेल भाजपात जाणार नाहीत. पण, बघेल भाजपात गेले, तर ‘महादेव’ बेटिंग अॅपचे ‘हर हर महादेव’ अॅप होईल. एवढं निर्लज्जपणाने चाललं असताना आपण गप्प कसं काय बसू शकतो?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय.
घरी बसणाऱ्यांना जनतेनं घरी बसवलं, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. याला उद्धव ठाकरेंनी सडेतोड प्रत्त्युत्तर दिलं आहे. खाल्ल्या घरचे वासे मोजणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे.
शिवसेना काँग्रेसबरोबर गेली म्हणजे ‘शिवसेनेची काँग्रेस’ झाली म्हणतात. गेली 20 वर्ष आम्ही भाजपबरोबर होतो. मात्र आमचा कधी भाजप झाला नाही. मग, काँग्रेस कसा होईल? असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
‘परवाची वाट बघू नाहीतर…’; जरांगेंचा सरकारला शेवटचा इशारा
आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर
मराठा आरक्षणावर बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य!
मोठी बातमी! ठाकरेंना धक्का; सगळ्यात जवळच्या नेत्याला ईडीचं समन्स
शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का!