आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

मुंबई | दिवाळीचा सण दोन दिवसांवर आला आहे. दिवाळी म्हटलं की, खरेदीची लगबग आली. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आपण विविध वस्तुंची खेरदी करतो. विशेषतः सोने-चांदीची खरेदी करतो. मात्र त्या पुर्वीच सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे.

गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या (Gold) भावात घसरण होत आहे. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी गेले दहा दिवस दिलासादाक ठरत आहेत. या दहा दिवासात सोन्याच्या भावात चढउतार राहिला. परंतू या दहा दिवसाच्या काळात तब्बल 1400 रुपयांनी सोन्याचे भाव उतरले आहेत.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आता सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोने 55, 925 रुपये, 23 कॅरेट 60,808 रुपये, 24 कॅरेट सोने 61,053 रुपये इतका आहे. सध्या सोन्याच्या भावात घसरण दिसून येत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी चांगले दिवस आहेत.

सोन्याच्या भावात घसरण झाली असली तरी, चांदीच्या (Silver) भावाने उच्चांक घेतला आहे. चांदीच्या भावात देखील घसरण होत होती. परंंतू  त्याला ब्रेक लागला.

गेल्या आठवड्यात चांदीच्या भावाात 1200 रुपायांनी घसरण झाली होती. त्यानंतर 6 नोव्हेंबरपर्यंत चांदीच्या भावात 1100 रूपयांची वाढ झाली. सध्या चांदीचे भाव एक किलोसाठी 75,200 रुपये इतका आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मराठा आरक्षणावर बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य!

मोठी बातमी! ठाकरेंना धक्का; सगळ्यात जवळच्या नेत्याला ईडीचं समन्स

शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का!

कौतुकास्पद! मेंढपाळाच्या लेकीनं बापाचं नाव काढलं; केली ही कामगिरी

पवारांच्या काटेवाडीत भाजपचा शिरकाव, पण किंग ठरले अजित पवारच!