“सोडून गेलेले सगळे आमदार पुन्हा परतणार आहेत”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नागपूर | काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Ncp) मोठी फुट पडली. राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडली आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले. शरद पवार यांची साथ सोडलेले आमदार पुन्हा परतणार आहेत, असा मोठा दावा माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे.

काल राज्यातील 2359 ग्रामपंचायतीचा (Grampanchyat Election) निकाल जाहीर झाला. त्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुखांनी माध्यमांशी सवांद साधला. ते म्हणाले, ” राष्ट्रवादीमध्ये इनकमींग सुरु झाली आहे. खुशाल बोपचे परतले आहेत, इतर आमदार देखील लवकरच येतील. काही आमदार खासगीमध्ये सांगतात की, सत्तेसाठी अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. निवडणुक जवळ आल्यावर ते पुन्हा येतील, असा दावा अनिल देशमुखांनी केला.

इंडिया आघाडीची पुढील बैठक नागपुरात होणार आहे. ही बैठक 4 नोव्हेंबरला प्रस्तावित होती. परंतू ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे ही बैठक पुढे ढकलली. पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुका झाल्यावर नागपुरमध्ये बैठक होईल, असं अनिल देशमुखांनी सांगितलं.

अनिल देशमुख यांच्या कटोल मतदारसंघातील 83 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. बहुतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादी पक्षाने जिंकल्या, जवळपास 80 टक्के ग्रामपंचायतीवर आम्ही विजय मिळवला आहे, असा दावा अनिल देशमुखांनी केला.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणुक होती. कालच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये अजित पवार गटाचा वरचष्मा दिसला. पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ग्रामपंचायती अजित पवार गटाने जिंकल्या. त्यामुळे शरद पवार गटासाठी ही चिंतेची बाब मानली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का!

कौतुकास्पद! मेंढपाळाच्या लेकीनं बापाचं नाव काढलं; केली ही कामगिरी

पवारांच्या काटेवाडीत भाजपचा शिरकाव, पण किंग ठरले अजित पवारच!

‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लीपवरून नवा वाद, जरांगे भडकले

रश्मिका मंदानाचा नको त्या अवस्थेतला व्हिडीओ व्हायरल; पाहून तुम्हालाही बसेल धक्का