पुणेकरांनो काळजी घ्या; अत्यंत चिंताजनक बातमी समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | एकीकडे थंडीची चाहूल लागली आहे, मात्र दुसरीकडे हवेची गुणवत्ता (Air Quality) खालवत चालली आहे. राज्यात वायू प्रदूषणात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

पुणेकरांनो काळजी घ्या

चांगल्या वातावरणासाठी पुण्याला ओळखलं जातं. मात्र आता पुण्याची हवा देखील प्रदुषीत झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यानं दिल्ली आणि मुंबईलाही हवेच्या गुणवत्ता बाबत मागे टाकलं आहे. मुंबई आणि दिल्ली पेक्षा पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावल्याचं समोर आलं आहे.

पुण्यातील गजबजलेल्या शिवाजीनगर परिसरातील एक्यूआय वाईट श्रेणीत असून हवा गुणवत्ता पातळी 271 वर तर भुमकर चौकातील एक्यूआय 260 वर आहे.

हवेची गुणवत्ता खालावल्याने त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. धूलिकण वाढल्याने आरोग्य विभागाकडून मास्क वापरण्याचं आवाहन दिलं आहे. राज्य सरकारने नागरिकांना खबरदारीचा सल्ला दिला आहे.

मुंबईपेक्षाही उपनगरांमधील हवा गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत आहे. मुंबई आणि उपनगरातील शहरांमध्ये पीएम 10 ची मात्रा अधिक आहे, यासाठी रस्त्यांवर धूळ, सुरु असणारे बांधकाम, औद्योगिक उत्सर्जन, वाहनांद्वारे होणारे प्रदूषण जबाबदार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुढील दोन दिवस राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता!

मराठा आरक्षणावर बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य!

मोठी बातमी! ठाकरेंना धक्का; सगळ्यात जवळच्या नेत्याला ईडीचं समन्स

शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का!

कौतुकास्पद! मेंढपाळाच्या लेकीनं बापाचं नाव काढलं; केली ही कामगिरी