पुढील दोन दिवस राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राज्यात ऑक्टोबर हिट संपल्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक शहराचं तापमान घसरलं आहे. सकाळी आणि संध्याकाळी गारवा निर्माण झाला आहे. त्याचवेळी आता अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे. राज्याच्या काही भागात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज आहे.

या भागांमध्ये पावसाची शक्यता

सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण तामिळनाडूमध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे.

पुणे हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवस हा पाऊस असणार आहे.पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाकडून वर्तवली गेली आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागात हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, मंगळवारी रात्री उशिरापासून जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उच्च उंचीच्या भागात नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स प्रवेश करेल. यामुळे काही भागात पावसाची शक्यता आहे.

देशात एकीकडे गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे, पण त्याच बरोबर हवेची पातळी घसरली आहे. धुके आणि धुलिकणांमुळे मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशात अनेक शहरांत प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मराठा आरक्षणावर बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य!

मोठी बातमी! ठाकरेंना धक्का; सगळ्यात जवळच्या नेत्याला ईडीचं समन्स

शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का!

कौतुकास्पद! मेंढपाळाच्या लेकीनं बापाचं नाव काढलं; केली ही कामगिरी

पवारांच्या काटेवाडीत भाजपचा शिरकाव, पण किंग ठरले अजित पवारच!