मराठा आरक्षणावर बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा दरबार भरणार आहे. 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबरला अयोध्यानगरी मैदानावर भव्य कार्यक्रम सुरू आहे. याच कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी बागेश्वर धाम बाबांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मराठा आरक्षणावर त्यांनी भाष्य केलं आहे.

मराठा आरक्षणाला बागेश्वर धाम बाबांचा पाठिंबा

मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मिळालं पाहिजे. भारत जेव्हा गुलामीत होता तेव्हा भारताला गुलामीतून स्वतंत्र करण्याचे उपकार मराठा समाजानं केले आहेत, असं बागेश्वर धाम बाबांनी म्हटलंय.

भारताला स्वातंत्र्य करण्याचं सर्वाधिक श्रेय मराठ्यांनाच जातं. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, असं म्हणत बागेश्वर बाबांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिलाय.

मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. भारत जेव्हा गुलामीत होता, तेव्हा आपलं शौर्य, वीरता दाखवून भारताला गुलामीगिरीतून स्वतंत्र करण्याचे उपकार मराठ्यांनी केले आहेत, असं ते म्हणालेत.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींच्या दरबाराला अंधश्रद्धा निर्मुलन सिमतीनं विरोध दर्शवला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! ठाकरेंना धक्का; सगळ्यात जवळच्या नेत्याला ईडीचं समन्स

शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का!

कौतुकास्पद! मेंढपाळाच्या लेकीनं बापाचं नाव काढलं; केली ही कामगिरी

पवारांच्या काटेवाडीत भाजपचा शिरकाव, पण किंग ठरले अजित पवारच!

‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लीपवरून नवा वाद, जरांगे भडकले