मोठी बातमी! ठाकरेंना धक्का; सगळ्यात जवळच्या नेत्याला ईडीचं समन्स

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे. त्यांना बुधवारी चौकशीला हजर राहण्याचं समन्समध्ये सांगण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकर यांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावण्यात आलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून कोरोना काळात मुंबई महापालिकेत विविध घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावरदेखील गंभीर आरोप केले होते.

याप्रकरणी पोलीस ठाण्यातही तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणांवर आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु होता. तसेच ईडीने देखील किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.

याआधी खिचडी घोटाळ्याप्रकरणी अनेकांना ईडीने समन्स बजावले आहेत. काहींची चौकशीदेखील झालीय. त्यानंतर आता पेडणेकर यांची चौकशी होणार आहे. त्यांची याआधी गुन्हे शाखेकडून देखील चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना ईडी चौकशीला देखील सामारं जावं लागणार आहे.

दरम्यान, किशोरी पेडणेकर बुधवारी ईडी चौकशीला जातात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण या ईडीच्या समन्समुळे त्यांच्या अडचणीत वाढ झालीय. किशोरी पेडणेकर या समन्सवर काय प्रतिक्रिया देतात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का!

कौतुकास्पद! मेंढपाळाच्या लेकीनं बापाचं नाव काढलं; केली ही कामगिरी

पवारांच्या काटेवाडीत भाजपचा शिरकाव, पण किंग ठरले अजित पवारच!

‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लीपवरून नवा वाद, जरांगे भडकले

रश्मिका मंदानाचा नको त्या अवस्थेतला व्हिडीओ व्हायरल; पाहून तुम्हालाही बसेल धक्का