पुणे इसिस मॉड्युल प्रकरण, तपासातून महाराष्ट्राला हादरवणारी माहिती समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | पुणे इसिस मॉड्युल प्रकरणी तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयएने महम्मद शाहनवाझ आलम याला नुकतीच अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे.

पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट 

पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट दहशतवाद्यांचा होता. पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट अतिरेक्यांनी आखला होता. त्यासाठी त्या दहशतवाद्यांना थेट सिरियामधून सूचना मिळत होत्या, अशा खळबळजनक दावा एनआयएने केला आहे.

पुणे शहरातील कोथरूड परिसरात 19 जुलै 2023 रोजी महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी याच्यासह शाहनवाझ आलमला दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना पुणे पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असताना शहानवाझ कोंढवा परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता.

दरम्यान, पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयएने आता आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात सात आरोपींवर एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

दशतवाद्यांनी दशतवादी तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबीर घेतले होते. त्यांनी अनेक अतिरेकी तयार करण्याचा प्रयत्न केला. आयईडी बनवण्यासाठी त्यांनी सामान एकत्र केले. लोकांमध्ये दहशत माजवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी जंगलामध्ये बॉम्बस्फोटाची चाचणीही केली होती, असं आरोपपत्रात सांगण्यात आलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

मराठा आरक्षणावर बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य!

मोठी बातमी! ठाकरेंना धक्का; सगळ्यात जवळच्या नेत्याला ईडीचं समन्स

शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का!

कौतुकास्पद! मेंढपाळाच्या लेकीनं बापाचं नाव काढलं; केली ही कामगिरी