‘परवाची वाट बघू नाहीतर…’; जरांगेंचा सरकारला शेवटचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

छत्रपती संभाजीनगर | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं असेल तरी मात्र अजून सरकारने यावर कोणताही तोडगा काढलेला नाही. अशात मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जरांगे राज्यात पुन्हा एकदा दौरा सुरु करणार आहेत. दरम्यान वारंवार सरकारला सांगून सुद्धा यावर आणखी कोणताच ठोस असा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

जरांगे पाटलांनी सरकारला कोणता इशारा दिला?

दरम्यान माध्यमांशी बोलत असताना जरांगे पाटील म्हणाले की, मला “सीएमओ ऑफिसमधून फोन आला होता, यावेळी उद्या शिष्टमंडळ भेटायला येणार आहे. बघू, ते झुलवतात. पण त्यांनी कारणही सांगितलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरला गेले म्हणून परवा येतो म्हणाले. त्यामुळे आम्ही त्यांची उद्या नाहीतर परवाची वाट बघू नाही तर मग आम्ही पुढची भूमिका घेऊ,” असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “ओबीसी नेते त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. त्यांच्याबद्दल सांगणारही नाही. त्यांचा प्रश्न त्यांच्याकडे आहे. सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसींचा प्रश्न आमच्याकडे आहे.  आमचं आम्ही ठरवलं आहे.

आपल्या गोरगरीबांचं कल्याण होणार आहे. फक्त एक दोन ओबीसींना ते पाहावत नाही. त्यामुळे मराठ्यांनी शांततेत आपली एकजूट वाढवा, असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

मराठा आरक्षणावर बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य!

मोठी बातमी! ठाकरेंना धक्का; सगळ्यात जवळच्या नेत्याला ईडीचं समन्स

शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का!

कौतुकास्पद! मेंढपाळाच्या लेकीनं बापाचं नाव काढलं; केली ही कामगिरी