मराठा नेत्यांना मनोज जरांगेंनी केली ‘ही’ विनंती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

छत्रपती संभाजीनगर | महाराष्ट्रात गेले काही दिवस मराठा आरक्षणावरुन रोज वाद विवाद सुरु आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarage Patil) सरकारला वारंवार इशारा देऊन सुद्धा यावर आणखी निर्णय होत नाहीये.

दरम्यान काही दिवसांपूर्वी जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरु केलं होतं. त्यावेळेस मराठा समाज आक्रमक झाला होता. मराठा समाजाने आरक्षणाची मागणी करुन सुद्धा सरकार यावर भूमिका घेत नसल्यामुळे राज्याच्या काही भागात जाळपोळ करण्यात आली होती. मात्र याच पार्श्वभूमीवर जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले जरांगे पाटील?

मराठ्यांनी शांततेत आणखी जास्त एकजूट वाढवावी. तसेच महाराष्ट्रातील मराठ्यांच्या नेत्यांनी एक विनंती आहे की, जाणून बुजून षडयंत्र रचलं जात आहे असं दिसतंय. कारण जे शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठ्यांच्या पोरांना खोट्या केसेसमध्ये गुंतवलं जात आहे.

याकडे मराठ्यांच्या नेत्यांनी लक्ष ठेवावं, कारण उद्या या पोरांची तुम्हाला गरज आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही मदत नाही केली तर हे मराठ्यांची पोरं तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत, असं मनोज जरांगे म्हणाले.

दरम्यान बीड येथे झालेल्या जाळपोळी प्रकरणावर देखील जरांगे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, बीडचे काही बांधव काल येथे आले होते, त्यांनी सांगितलं की भुजबळांच्या पाहुण्यांचं फुटलेलं हॉटेल हे त्यांच्याच पोरांनी फोडलं आहे, अशी खात्रीलायक माहिती मला मिळाली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘परवाची वाट बघू नाहीतर…’; जरांगेंचा सरकारला शेवटचा इशारा

आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

मराठा आरक्षणावर बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य!

मोठी बातमी! ठाकरेंना धक्का; सगळ्यात जवळच्या नेत्याला ईडीचं समन्स

शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का!