भुजबळांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचा मराठा आरक्षणाला विरोध!

मुंबई | मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास विरोध केलाय. भुजबळांनी काल पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली. आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शवला आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्यास विजय वडेट्टीवारांनी विरोध दर्शवला. आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या. सरसकट आरक्षण देण्यास आधीही विरोध होता आणि आताही आहे.

ओबीसीतील अनेक जातींचा अवस्था वाईट आहे. त्यांना काहीच मिळालं नाही. इथे बळी तो कानपिळी आहे. त्यामुळे ओबीसीतील असलेल्या घटकांना जे मिळालं पाहिजे ते मिळत नाही, ते मिळालं पाहिजे, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी यावेळी मांडली आहे.

कुणबी नोंदणीचं काम शिंदे समितीला दिलं आहे. त्याबरोबरच ओबीसींच्या सर्व जाती शोधाव्या आणि श्वेतपत्रिका काढा. ओबीसींना 67 पुरावे मागितले जात आहेत. त्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे अख्ख्या नोंदणी शोधा. त्यातून सांगा या जाती ओबीसीच्या आहेत या जाती कुणबी आहेत हे सांगा, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.

आमचाही त्रास कमी होईल. आम्हालाही उतारे शोधताना त्रास होतो. प्रमाणपत्रासाठी त्रास होतो, तो कमी होईल. जो समाज हक्कासाठी भांडतो त्यामुळे मला त्यांच्या सोबत उभं राहणं भाग आहे. त्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली.

तुम्ही येणार तर वाढवून घ्या. वेगळा प्रवर्ग घ्या. तुम्ही 50 टक्केच्या आतमध्येची मागणी करताय. हा निर्णय सरकारने जाहीर केलाय. मग वाढवून द्या. ओबीसी समाजाला दुखवू नका, असं ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

बांदेकरांना पुन्हा संधी नाही; सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद ‘या’ नेत्याकडे

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप

मराठा आरक्षणावर बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य!

मोठी बातमी! ठाकरेंना धक्का; सगळ्यात जवळच्या नेत्याला ईडीचं समन्स

शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का!