‘कोणाला डेंग्यूच काय होतो….’; काँग्रेसचा बडा नेता संतापला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवरून भाजपला फटकारलं आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) देखील टोला लगावला आहे.

काही मंत्र्यांना डेंग्यू झालेला आहे, कोण कुठे काय करतंय हे राज्याला काही कळायला मार्ग नाही, असं म्हणत पटोलेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

भाजपला (Bjp) संधी देतो की जेवढ्या त्यांच्या जागा आल्या आहेत, त्याची यादी जाहीर करावी. खोटारडेपणा भाजपने करू नये. लोकमताला अशापद्धतीने वळवू नये. मूळ प्रश्नांवरून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे, असं नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. राज्यातील मंत्रिमंडळातील दोन मंत्री वेगवेगळी भाषा बोलतात. हे सरकार राहणार नाही असं त्यांचे मंत्री बोलत आहेत, असंही नाना पटोलेंनी (Nana Patole) म्हटलंय.

आरक्षणाबाबत वातावरण पसरवण्याचं काम करून महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, बेरोजगारीवर, गुजरातहून जे ड्रग्स आणले जातात त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर भाजपने दिली पाहिजेत, असं पटोलेंनी सांगितलंय.

गरीब आणि श्रीमंत अशा दोनच जाती निर्माण करण्याचा मोदींचा मनसुबा असेल तर तेही भाजपाने स्पष्ट केलं पाहिजे. त्या पद्धतीने आरक्षणाचं गाजर दाखवून लोकांची मते घ्यायची आणि दुसरीकडे आरक्षणच संपवायचा हा अजेंडा स्पष्ट केला पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.

जे उद्योग तुम्ही गुजरातला नेले आणि तरीही महाराष्ट्रच नंबर वन आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय, पण वस्तुस्थिती भाजपाने मांडली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!

भुजबळांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचा मराठा आरक्षणाला विरोध!

बांदेकरांना पुन्हा संधी नाही; सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद ‘या’ नेत्याकडे

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप

मराठा आरक्षणावर बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य!