मोठा दावाः “फडवीसांच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध केला नसता, तर आरक्षण टिकवलं असतं”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच गाजत आहे. मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करण्यासाठी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मराठा समाजाची मागणी आहे. जालन्याच्या आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी या मागणीसाठी उपोषण छेडलं होतं. सध्या सरकारला वेळ वाढवून दिल्यानं हे उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे, मात्र मराठा समाजाच्या आरक्षणावरुन राज्यात सध्या चांगलंच वातावरण तापलेलं आहे.

मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करण्याला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे, त्यावरुन ओबीसी नेत्यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारची सध्या चांगलीच कोंडी झाली असून राज्य सरकार नेमकं काय करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्यातच आता विविध दावे प्रतिदावे केले जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी असाच एक दावा केला आहे, ज्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

नेमकं काय म्हणालेत चंद्रशेखर बावनकुळे?

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 2019 मध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध केला नसता, तर त्यावेळी देण्यात आलेले मराठा आरक्षण (Maratha Reservation) टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले असते. एवढंच नव्हे तर मराठा समाजाला त्यांनीच न्याय मिळवून दिला असता”, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

नागपुरात बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता राज्याच्या राजकारणात उलटसूलट चर्चा सुरु झाली आहे. मराठा आरक्षणावर सध्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आक्रमक वक्तव्ये करत आहेत, त्यात आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवं वक्तव्य केलं आहे, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आणखी काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळेच मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे, मात्र असं असलं तरी महायुतीचं सरकार मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे, असं बावनकुळे म्हणाले. छगन भुजबळ यांची भूमिका ही सर्वपक्षीय बैठकीनं घेतलेल्या भूमिकेसारखी आहे, ते वेगळे काही बोललेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला जसं वेगळे आरक्षण दिलं होतं, तसंच टिकावू आरक्षण आतादेखील आमचं सरकार पुन्हा देईल, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘कोणाला डेंग्यूच काय होतो….’; काँग्रेसचा बडा नेता संतापला

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!

भुजबळांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचा मराठा आरक्षणाला विरोध!

बांदेकरांना पुन्हा संधी नाही; सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद ‘या’ नेत्याकडे

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप